Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राजस्थान येथील मालकांची कार नौकराने चोरली स्थानिक गुन्हे शाखेने कार सह आरोपी १३ दिवसात केले जेरबंद ….
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १६/०२/२०१४ रोजी तक्रारदार गोविंदसिंह उगमसिंह गेहलोत रा. पदाला नयाबोरा मंडोर,जोधपुर, राजस्थान यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा येथे तक्रार दिली कि, त्याचे जोधपुर येथे हॉटेल व्यवसाय असुन त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा भरत उर्फ विकी पवार रा. शहर पळशी हा वेटर म्हणुन कामाला
होता. हॉटल व्यवसायामध्ये वेटरची आवश्यता असल्याने त्यांचा नौकर भरत पवार याने त्यांना विश्वासात घेवून माझ्या सोबत छत्रपती संभाजीनगरला चला तिथे मी तुम्हाला ३ ते ४ वेटर काम करणारे व्यक्तींचा परिचय करून देतो तसेच शिर्डी येथील साईबाबाचे दर्शन करून आणतो असे सांगीतल्याने ते त्यांचे पत्नी सह दिनांक १४/०२/२०१४ रोजी जोधपुर येथून पत्नीसह व नौकर भरत पवार असे त्यांची हुंदाई औरा कार क्रमांक RJ 19 CM 5775 हीने निघुन धुळे पर्यंत त्यांनी स्वतः कार चालविली व पुढील रस्ता भरत पवार याला माहिती असल्याने त्यांनी कार त्याला चालविण्यास देवुन ते पत्नीसह मागील सिटवर बसले. दिनांक १७/०२/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेच्या सुमारास नौकर भरत पवार यांने माझ्या घरी मुक्कामासाठी चला असे सांगुन छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी परिसरातील श्रीकृष्ण रेसिडेन्सी येथे आम्हाला घेवून आला व सामानासह आम्हाला कार खाली उतरवुण कार पार्किंग करून येतो असे सांगुन कार घेवुन गेला तर तो परत आलाच नाही त्याला ब-याच वेळा कॉल केले असता त्यांने त्याचा मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवला. आपली कार नौकर भरत पवार याने चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाणे चिकलठाणा येथे भादंवी कलम ३८१,४०७, ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन चिकलठाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हयांचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. यावरुन स्थागुशा कारसह आरोपीचा शोध घेत असतांना पोलिस निरीक्षक स्थागुशा सतिश वाघ, यांना गोपनीय बातमीदार मार्फेत माहिती मिळली कि आरोपी हा कारसह राहटा जि. अहमदनगर येथे लपुन बसला आहे. यावरुन स्था. गु.शा चे पथकांने तात्काळ राहटा येथे जावुन
आरोपीचा कसोशिने शोध घेतला असता, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तो नितु धाबा, राहटा जि. अहमदनगर या परिसरात असल्याची खात्री झाल्याने आरोपी हा नितु धाबा येथे जेवणासाठी थांबलेला असतांना त्यांचेवर अचानक झडप घालुन त्याला पथकांने जेरबंद केले त्यांचे ताब्यातून त्यांने चोरुन आणलेली हुंदाई औरा कार क्रमांक RJ19 CM 5775 ज्याची किंमत अंदाज ७,५०,०००/- ही जप्त करण्यात आली असुन नमुद गुन्हयात आरोपी भरत उर्फ विकी विजय पवार वय ३२ वर्षे रा. पवार गल्ली, कन्नड, ह.मु. शहर पळशी ता.जि. छ. संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे व पुढील तपास चिकलठाणा पोलिस करित आहेत.
नमुद गुन्हयाचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांनी अवघ्या १३ दिवसांत छडा लावुन कारसह, आरोपी जेरबंद केला. राजस्थान येथील मुळ मालकास त्याची चोरी गेलीली कार ही अत्यंत कमी कालावधीत परत मिळाल्याने त्याने पोलिसांचे आभार व्यक्त करून आनंद व्यक्त केला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिश वाघ,पोउपनि भगतसिंग दुलत,पोलिस अंमलदार नामदेव सिरसाठ, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमळे, सर्व स्थागुशा. यांनी केली आहे.