Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिल्या दिवशी ‘लापता लेडीज’ सिनेमानं ७० लाखांची कमाई केली होती. पहिल्या दिवशी वर्किंग डे असतानाही शुक्रवारी सिनेमानं ७० लाखांचा आकडा पार केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं तब्बल १.३४ कोटींची कमाई केली आहे. तर दोन दिवसांत सिनेमानं दोन कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या दिवसांत माउथ पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होईल, असं म्हटलं जात आहे.
बजेट किती ?
३००-४०० कोटींचे सिनेमे बनत असताना लापता लेडीज मात्र पाच ते सहा कोटींमध्ये तयार झालेला सिनेमा आहे . अभिनेता आमिर खान याच्या निर्मिती संस्थेनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पाच ते सहा कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाच्या कमाईचे हे आकडे समाधानकारक आहेत. प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलंय. कोणताही मोठा स्टार नसताना एक चांगला सिनेमा पाहिल्याचं अनेकांनी म्हटलंय. सोशल मीडियावर देखील सिनेमाचं आणि किरण राव हिचं कौतुक होताना दिसत आहे.
किरण राव हिच या सिनेमाची हिरोईन असल्याचं अनेकांनी तिचं कौतुक करताना म्हटलंय. गेल्या काही महिन्यांपासून किरण राव या सिनेमाचं प्रमोशन करत होती. हा सिनेमा तिच्यासाठी बऱ्या अर्थांनी खास असल्याचं तिनं म्हटलं.
काय आहे लापता लेडीज सिनेमाची कथा?
हा चित्रपट दोन नवविवाहीत वधूंच्या अवतीभवती फिरतो. फुलकुमारी म्हणजेच नितांशी गोयल आणि पुष्पा म्हणजे प्रतिभा रत्नाया… दोन नवविवाहीत वधू रेल्वे प्रवासात अचानक गायब होतात. त्यानंतर काय गोंधळ घडतो, याची ही साधी गोष्ट आहे.२००१मध्ये देशाच्या ग्रामीण भागात घडणारी ही गोष्ट मांडताना किरण राव हिनं कथासूत्र, काळाचे संदर्भ आणि पटकथेचे धागे घट्ट विणले जातील, याची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय.