Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

11

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….,

रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. दिनांक १५/०२/२०२४ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस स्टेशन गु.र.नं. २३२/२०२४ भा.दं.वि.का.क. ३९४ व दि. १६/०२/२०२४ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गु.र.नं. १३४/२०२४ भा.दं.वि.का.क. ३९५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्हयांमध्ये चारचाकी कार मालकांना प्रवासाकरीता बाहेरगावी जाण्याचे आहे असे सांगून गाडी भाडयाने घेण्यात आली होती. काही अंतर जावून निर्जन वस्ती
चे ठिकाणी कार चालकास मारहाण करून त्यांचेकडील रोख रक्कम मोबाईल काढून घेवून त्यास रस्त्यात सोडून देवून
जबरदस्तीने कार चोरून नेल्या आहेत.

तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे गुन्हयात स्विफ्ट डिझायर कार नं. MH-12-SY-9243 व रांजणगाव पोलिस स्टेशनचे गुन्हयात इनोव्हा कार नं. MH-12-MW-9990 या वाहनांची जबरीने चोरी झाली होती. गुन्हयाचा प्रकार हा गंभीर होता व एकापाठोपाठ दहा दिवसांत दोन घटना घडल्याने कार चालक व भाडे तत्वावर
वाहने पुरविणारे व्यावसायिक यांचेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर गुन्हयांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे  पुणे विभाग,  उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रशांत ढोले शिरूर विभाग, यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्था.गु.शा.चे वतीने नमुद गुन्हयांचे समांतर तपासादरम्यान दोन पथके तयार करणेत आली. गुन्हयातील आरोपी हे प्रवासी म्हणून कारमध्ये ज्या ठिकाणी बसले होते, तसेच आरोपींनी चालकास मारहाण करून ज्या ठिकाणी सोडून दिले होते त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. दोन्ही वाहने ही राहुरी चे दिशेने गेल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान सुमारे १५० सीसीटीव्ही तपासण्यात आले. दोन्ही वाहने छत्रपती संभाजी नगर येथे गेली असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारचे गुन्हे करणारे छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराला माहिती मिळाली की, विकास संतोष दानवे रा.
जवखेडा, जालना व भरत कड्डुबा हजारे रा. छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने सदरचे गुन्हे केले असून
ते सर्वजण छत्रपती संभाजी नगर येथे आहेत व दोन्ही वाहने त्यांचेजवळ असून त्याचा ते वापर करत आहेत. अशी बातमी मिळाल्याने स्थागुशाची दोन्ही पथकांनी छत्रपती संभाजी नगर शहरात जावून आरोपी नामे

१) विकास संतोष दानवे वय २१ वर्षे रा. जवखेडा ता. भोकरदन जि जालना

२) भरत कडुबा हजारे वय २४ वर्षे,

३) विकी एकनाथ पाखरे वय २६ वर्षे

४) सिताराम गंगाधर विर वय २८ वर्षे तिघेजण रा. आप्पतगाव ता.जि. छत्रपती संभाजी नगर

५)सारंग काशिनाथ खाकरे, वय २४ वर्षे रा. चिंचपूर ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर,

६) शिवानंद महादेव दुधभाते वय २६ वर्षे रा. गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर

यांना छत्रपती संभाजी नगर परीसरातून ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्हे केल्याचे सांगितले व त्यांचेकडून इनोव्हा कार व स्विफ्ट डिझायर कार असा किं.रू. १३,००,०००/- किं.चा मुद्देमाल हस्तगत करून वर नमुद दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी विकास दानवे याचेवर दरोडा व मारहाणीचे एकूण ०५ गुन्हे दाखल असून आरोपी सिताराम विर याचेवर चोरीचा ०१ गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी  पोलिस अधीक्षक  पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. महादेव वाघमोडे, स्थागुशा येथील पोउपनि गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण,अतुल डेरे, योगेश नागरगोजे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, संजू जाधव, दगडू विरकर, रांजणगाव पो स्टे चे सपोनि मनोज नवसरे, पोलीस अंमलदार दतात्रय शिंदे, अभिमान कोळेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी केली असून
आरोपींना मा. न्यायालयाने दि. ०७/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.