Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली? Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G झाले स्वस्त

12

Xiaomi नं आपल्या दोन पॉपुलर स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीच्या सबब्रँड Redmi चा एखादा फोन जर खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर कंपनीचे दोन स्मार्टफोन्स सध्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G ची किंमत कमी केली आहे. सध्या भारतात वेगाने 5G टेक्नॉलॉजीचा विस्तार होत आहे आणि ५जी नेटवर्क देशातील जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहे, त्यामुळे युजर्स 5G टेक्नॉलॉजीवर शिफ्ट करत आहेत. त्यामुळेच 4G स्मार्टफोन डिवाइसेस आता कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत, अशी चर्चा आहे. चला जाणून घेऊया रेडमीचे हे दोन्ही स्मार्टफोन किती स्वस्त झाले आहेत.

Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G, दोन्ही मॉडेल आता कमी किंमतीत उपलब्ध झाले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सच्या 6GB RAM, 128GB स्टोरेज मॉडेल्सची किंमत कमी करण्यात आली आहे. १ मार्च पासून ही नवीन किंमत लागू देखील झाली आहे. Redmi Note 12 4G ची किंमत आता १३,९९९ रूपयांवरून १२,९९९ रुपये झाली आहे. तर Redmi 12 4G ची किंमत १०,९९९ रुपयांच्या ऐवजी १०,४९९ रुपये झाली आहे.

Redmi Note 12 4G specifications

Redmi Note 12 4G मध्ये ६.६७ इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजॉल्यूशन २४०० x १०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 685 चिपसेटसह येतो. डिवाइस Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो. यात ५० एमपीचा मेन कॅमेरा, ८ एमपीचा दुसरा कॅमेरा आणि २ एमपीचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच याच्या फ्रंटला १३ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 4G मध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली ५,००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi 12 4G specifications

Redmi 12 4G स्मार्टफोन ६.७९ इंचाच्या फुलएचडी प्लस डिस्प्लेसह येतो ज्यात ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यात २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आहे, आणि ४५० निट्स पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Glass चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑपरेटिंग सिस्टम Android 13 आधारित MIUI 14 आहे. Redmi 12 4G मध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅटरी कॅपिसिटी ५,०००एमएएचची आहे सोबत १८वॉट फास्ट चार्जिंग आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये WiFi, GPS, Bluetooth, v5.0, NFC, आणि USB Type-C चा सपोर्ट मिळतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.