Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vivo नं कायमची कमी केली ३ Smartphones ची किंमत; आता १० हजारांच्या आत करता येणार खरेदी

8

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo नं आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही Cheap Vivo Smartphone शोधत असाल तर ही बेस्ट संधी ठरू शकते. कंपनीनं एकाच वेळी तीन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे या सर्व मोबाइल्सचे दर कमी करून १०,००० रुपयांपेक्षा कमी केले आहेत. ब्रँडनं Vivo Y16, Vivo Y02T आणि Vivo Y02 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

हे विवो फोन झाले स्वस्त

Vivo Y02 Price Cut

Vivo Y02 स्मार्टफोनचा ३जीबी रॅम व ३२जीबी स्टोरेज असलेला मॉडेल आता ७,९९९ रुपयांच्या ऐवजी ६,९९९ रुपयांमध्ये मिळेल. कंपनीनं याची किंमत १००० रुपयांनी कमी केली आहे. डिवाइसमध्ये ६.५१ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो. यात मीडियाटेक हीलियो पी२२ ऑक्टा-कोर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. तर अँड्रॉइड १२ गो एडिशन आधारित फनटच ओएस १२ आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यातील ५,०००एमएएचची बॅटरी १०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo Y02T Price Cut

Vivo Y02T स्मार्टफोनचा ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज मॉडेल १००० रुपयांच्या प्राइस कट नंतर ७,४९९ रुपयांमध्ये मिळेल जो ८,४९९ रुपयांना विकला जात होता. हा स्मार्टफोन ६.५१ इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३ मिळतो. सोबत मीडियाटेक हीलियो पी३५ ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ४जीबी वचुर्अल रॅमसह ८जीबी रॅमची ताकद आहे.

Vivo Y02T स्मार्टफोन सिंगल कॅमेरा आणि सिंगल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/२.० अपर्चर असलेला ८ मेगापिक्सलचा सेन्सर आहे तसेच फ्रंट पॅनलवर एफ/२.२ अपर्चर असलेला ५ मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी या विवो फोनमध्ये ५,०००एमएएची बॅटरी देण्यात आली आहे जी १०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Vivo Y16 Price Cut

Vivo Y16 चा ४जीबी रॅम सह १२८ जीबी स्टोरेज असलेला टॉप मॉडेल १०,९९९ ऐवजी आता ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज असलेला मॉडेल ९,९९९ रुपयांच्या ऐवजी ८,९९९ रुपयांना विकला जाईल.

विवो वाय१६ ४जी स्मार्टफोन बाजारात ६.५१ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह आला आहे. यात अँड्रॉइड १२ आधारित फनटच ओएस १२ मिळते. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो पी३५ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन ५ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी विवो वाय१६ ४जी ५,०००एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी १०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.