Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२ हजारांत आला 6000mAh बॅटरी असलेला Samsung चा 5G Phone; ४ वर्ष राहील अप-टू-डेट

8

सॅमसंगनं आपल्या 5G Phone प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एफ सीरीजचा नवीन मोबाइल सादर केला आहे. या Samsung Galaxy F15 5G नावाने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. डिव्हाइसमध्ये युजर्सना दोन दिवसांचा बॅकअप देणारी 6000mAh ची बॅटरी, सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी ६१०० प्लस चिपसेट सारखे अनेक फीचर्स मिळतात. चला, जाणून घेऊया फोन संबंधित संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy F15 5G ची किंमत

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये आला आहे. मोबाइलच्या ४जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शनची किंमत १५,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy F15 5G चा मोठा मॉडेल ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेजसह १६,९९९ रुपयांना विकला जाईल.

ब्रँडनं युजर्ससाठी लाँच ऑफर देखील सादर केली आहे. ज्यामुळे बँक ऑफर आणि इतर डिस्काउंटनंतर फोनचा बेस मॉडेल १२,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. हा डिव्हाइस संध्यकाळी ७ वाजता अर्ली सेलमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. तर ओपन सेल फ्लिपकार्ट, कंपनीच्या वेबसाइटसह अन्य रिटेल आउटलेट्सवर सुरु केला जाईल. मोबाइल अ‍ॅश ब्लॅक, जॅजी ग्रीन आणि ग्रूव्ही वायलेट सारखे तीन कलरमध्ये येतो.

Samsung Galaxy F15 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F15 5G मध्ये ६.५ इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असेलली स्क्रीन आहे. जी सॅमसंग इनफिनिटी ‘यू’ नावाने आला आहे. या स्क्रीनवर हाय पिक्सल रिजॉल्यूशन आणि ९०हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेट मिळेल.

सॅमसंगनं आपल्या या Galaxy F15 5G मोबाइलमध्ये इंडस्ट्रीची नवीन आणि दमदार MediaTek Dimensity 6100+ चिपसेट देण्यात आला आहे. Samsung Galaxy F15 5G फोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात युजर्सना ४ वर्षांचे अपग्रेड देखील दिले जातील. तसेच कंपनी ५ वर्ष सिक्योरिटी अपडेट देखील येईल. मोबाइलमध्ये ड्युअल सिम ५जी, वायफाय ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक ऑप्शन दिले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी एफ१५ ५जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर डिवाइस ५ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

सॅमसंग गॅलेक्सी एफ१५ ५जी फोनची सर्वात मोठी खासियत यातील बॅटरी आहे कारण यात ६,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ब्रँडचा दावा आहे की हा तुम्हाला २ दिवसांचा बॅकअप मिळेल. ही चार्ज करण्यासाठी २५वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.