Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमरावती शहर परीसरात गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्या टोळीच्या युनीट १ ने आवळल्या मुसक्या…

7

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने  आवळल्या मुसक्या…

अमरावती ( शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात युनीट 1 ला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी भुषण शालीकराम राठोड (वय 30 वर्षे), रा.आदर्श – नेहरू नगर, मालटेकडी अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे कि, यातील फिर्यादी हे परतवाडा येथुन अमरावती येथे बसने गर्ल्स हायस्कुल चौक येथे उतरले व घरी जाण्याकरीता ऑटोमध्ये बसुन बियाणी चौक येथे उतरले. तेथुन सर्किट हाऊस रोडने पायी घरी जात असताना घराकडे जाणा-या गल्लीत वळल्या असता अचानक दुचाकीवर बसुन दोन इसम फिर्यादीचे मागुन आले व थोडे समोर जाऊन परत वळले व त्या पैकी मोटारसायकल वर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र किंमत अंदाजे 20,000/- रु. चे हिसकावुन मोटारसायकलवर बसुन पळुन गेले. मोटार सायकलचा क्रमांक फिर्यादी पाहु शकले नाहीत. अशा रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(दि.20फेब्रुवारी) रोजी अमरावती शहर आयुक्तालयाचे हद्दीमध्ये दोन अनोळखी इसमांनी स्पिड बाईक गाडीने चार ठिकाणी चैन स्नॅचिंग केली हाती त्यावेळी सदर गुन्हा हा अतीसंवेदनशील असल्याने आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते. पोलिस आयुक्त यांनी सदर गुन्हा सदर्भाने विशेष बैठक घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत तपासा अनुषंगाने मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते.

सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्र.01 अमरावती हे बारकाईने करत असताना अमरावती आयुक्तालयातील प्रत्येक चौकात तसेच रेकॉर्डवरिल गुन्हेगार तसेच बातमीदाराकडून माहीती घेऊन प्रत्येक दृष्टीकोनातून गुन्हा उघड करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असताना तांत्रिक माहीती वरून गुन्हेगार हे दिग्रस येथील असल्याची खात्रीशिर माहीती प्राप्त झाल्याने त्या दिशेने तपास करून मागील दोन दिवस अहोरात्र मेहनत करून दिग्रस येथील आरोपी नामे 1) रोनक किशोर राठोड (वय 18 वर्षे), रा.लक्ष्मी नगर दिग्रस जि.यवतमाळ याला ताब्यात घेवून गुन्हा अनुषंगाने प्राथमीक तपास केला असता त्यानी त्याचा मित्र गब्बर शहा वल्द मजीद शहा (वय 29 वर्ष) रा.भवानी नगर दिग्रस याने मिळून अमरावती शहरातील (दि.20फेब्रुवारी) रोजीच्या चैन स्नॅचीग (जबरी चोरी) गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. तसेच आरोपी गब्बर शहा याला त्याच्या राहण्याचे संभाव्य ठिकाणी व त्याचे राहते घरी शोध घेतला असता अमरावती शहर पोलीस त्याचे शोधात माहिती झाल्याने तो दिग्रस येथून ब-याच दूर निघून गेल्याचे गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली तसेच पोलीस स्टेशन दिग्रस येथून सदर आरोपीबाबत माहीती घेतली असता सदर आरोपी हा सराईत व चैन स्नॅचिंग चा गुन्हेगार असून त्याचे एका ठिकाणी वास्तव्य नसून तो त्याचे वास्तव्य वांरवार बदलवीत असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तसेच फरार आरोपी गब्बर शहा याचा शोध घेऊन याला अटक करण्याची तजवीज ठेवून आरोपी रौनक राठोड याला त्याने गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह ताब्यात घेवून पुढील कार्यवाही साठी पोलीस स्टेशन फेजरपूरा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्र. 01 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, अनिकेत कासार (पो.स्टे सायबर) पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीश देशमूख, पंकज गाडे (पो.स्टे सायबर) नाईक पोलीस अंमलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, भुशन पदमणे, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यानी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.