Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
फ्लिपकार्ट UPI Android आणि iOS वरही उपलब्ध
फ्लिपकार्ट UPI’ सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. तथापि, नवीनतम UPI पेमेंट फीचरचा लाभ घेण्यासाठी, युजर्सना त्यांच्या फोनवर फ्लिपकार्ट ॲपची अपडेटेड आवृत्ती डाउनलोड करावी लागेल. जर तुम्ही सध्याचे फ्लिपकार्ट युजर्स असाल तर तुम्ही हे ॲप अपडेटेड व्हर्जनवर अपडेट करू शकता. फ्लिपकार्टची अपडेटेड आवृत्ती Google Play Store आणि App Store वर उपलब्ध झाली आहे.
Flipkart UPI कसे करावे ॲक्टिव्ह
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्लिपकार्ट ॲप उघडा.
- यानंतर ‘स्कॅन आणि पे’ ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला ‘माय यूपीआय’ पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव सिलेक्ट करावे लागेल.
- आता तुमचे बँक तपशील एंटर करा.
- Flipkart आता SMS ने तुमच्या बँक तपशीलांची पडताळणी (व्हेरिफिकेशन) करेल. यानंतर तुमचा ‘Flipkart UPI’ सक्रिय होईल.
वापरू शकता स्कॅन आणि पे
‘Flipkart UPI’ वापरण्यासाठी, तुम्ही स्कॅन आणि पे वापरू शकता. स्कॅन आणि पे पर्यायामध्येच, तुम्हाला माय यूपी सेक्शनमध्ये मोबाइल रिचार्ज आणि बिल करण्याचा पर्याय देखील मिळेल. यासोबतच फ्लिपकार्टने ‘Flipkart UPI’ पेमेंटवर 10 रुपयांपर्यंत मर्यादित कालावधीची ऑफर देखील सादर केली आहे. याच्या मदतीने तुम्ही ‘Rupay credit card’ देखील लिंक करू शकाल.
फ्लिपकार्टची स्वतंत्र पेमेंट सेवा
Flipkart ने ‘PhonePe’ 2016 मध्ये विकत घेतला होता. Flipkart च्या मालकीचे ‘PhonePe’ हे भारतातील लोकप्रिय UPI पेमेंट ॲप म्हणून उदयास आले होते. तथापि, 2022 मध्ये दोन्ही कंपन्या वेगळे झाल्या. यानंतर आता फ्लिपकार्टने स्वतःची UPI सेवा सुरू केली आहे.
ॲमेझॉनशी स्पर्धा
या नवीन सेवेमुळे, फ्लिपकार्ट केवळ पेटीएम सारख्या ऑनलाइन पेमेंट ॲप्सशीच स्पर्धा करणार नाही तर त्याची सर्वात मोठी स्पर्धक असलेल्या ‘ॲमेझॉन’शीही स्पर्धा करेल. Amazon कंपनी ‘Amazon Pay’ नावाची UPI पेमेंट सेवा देते ज्याद्वारे युजर्स बिल आणि मोबाइल रिचार्ज सारख्या गोष्टी करू शकतात.