Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nothing Phone 2 वर जबरदस्त सूट
नथिंग फोन २ चा १२जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेला ४४,९९९ रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन आता सेलमध्ये ३६,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. म्हणजे तुम्हाला थेट ८,००० रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच आयसीआयसीआय बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून २,००० रुपयांची विशेष सूट मिळवता येईल. तर जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर ३०,००० रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल. परंतु डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशनवर अवलंबुन असेल.
Nothing Phone 2 स्पेसिफिकेशन्स
Nothing Phone 2 मध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी+ एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६०० नीट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ह्या फोनच्या मागे सॉफ्ट कर्व्ह असलेली ग्लास बॅक आहे तर ह्याची मिडफ्रेम पूर्णपणे रिसायकल अॅल्युमिनियमपासून बनवण्यात आली आहे.
ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला १२जीबी पर्यंत रॅम आणि ५१२जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन ४७००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी ४५ वॉट पीडी फास्ट चार्जिंग आणि १५ वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन अँड्रॉइड १३ आधारित नथिंग ओएस २.० वर चालतो.
हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० सेन्सर देण्यात आला आहे आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सॅमसंग जेएन१ सेन्सर देण्यात आला आहे जो मॅक्रो शॉट्स घेऊ शकतो. ह्या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
फोनची खासियत असलेला ग्लीफ इंटरफेस आता अपडेट करण्यात आला आहे. त्यामुळे हा आता व्हॉल्युम इंडिकेटर, टायमर आणि फोन रिंग किंवा नोटिफिकेशन आल्यावर चमकण्याचे काम करतो. तुम्ही आता ह्याची ब्राइटनेस आणि इतर गोष्टी कस्टमाइज करू शकता.