Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
३२एमपीचा सेल्फी कॅमेरा आणि जबरदस्त डिस्प्लेसह स्वदेशी स्मार्टफोन लाँच; इतकी आहे Lava Blaze Curve 5G ची किंमत
Lava Blaze Curve 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
नावाप्रमाणे Lava Blaze Curve 5G मध्ये एक कर्व्ह अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आकार ६.६७ इंच आहे. ही स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० चिपसेटची पावर देण्यात आली आहे. सोबत ८जीबी एलपीडीडीआर५ रॅम आणि २५६जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज देण्यात आली आहे. वर्चुअली ८जीबी रॅम अतिरिक्त देखील मिळवता येईल.
हे देखील वाचा:
कॅमेरा सेगमेंट पाहता लावा ब्लेज कर्व्ह ५जी मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा ईआयएस सपोर्ट असलेला ६४एमपीचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत ८एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो तर २एमपीचा मॅक्रो सेन्सर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं यात ३२एमपीचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या नवीन लावा मोबाइलमध्ये स्टिरिओ स्पिकर्सचा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी असे बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
नवीन ब्लेज कर्व्ह ५जी स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो. कंपनीनं यात नियमित अँड्रॉइड अपडेट देण्याची घोषणा केली आहे. हा फोन अँड्रॉइड १४ आणि १५ वर देखील अपडेट होईल. तसेच त्रैमासिक सिक्योरिटी अपडेट देखली दिले जातील.
Lava Blaze Curve 5G Price
Lava Blaze Curve 5G ची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरु होते, ही फोनच्या १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. टॉप मॉडेलमध्ये २५६जीबी स्टोरेज मिळते ज्यासाठी १८,९९९ रुपये खर्च करावे लागतील. हा हँडसेट अॅमेझॉन, लावा ई स्टोर आणि रिटेल स्टोर्सवर ११ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून उपलब्ध होईल. फोन आयर्न ग्लास आणि विरीडियन ग्लास कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
अॅमेझॉनवर हा फोन काही ऑफर्ससह लिस्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे Blaze Curve 5G ची किंमत आणखी कमी होऊ शकते.