Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा शब्दच चुकीचा वापरला असेल तर आता मेसेज पाठवल्यावर तुम्ही तो १५ मिनिटांच्या आत एडिट करू शकाल, असं इंस्टाग्रामनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. एखादा मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला पाठवलेल्या मेसेजवर टच करून होल्ड करावं लागेल आणि त्यानंतर येणाऱ्या ड्रॉप डाउन मेन्यूमधून “edit” ऑप्शन निवडावा लागेल. मेसेज एडिट केल्याची माहिती युजर्सना मिळेल. असंच फिचर फेसबुक आणि अॅप्पलच्या आयमेसेजवर देखील आहे.
पिन चॅट
तसेच इंस्टाग्रामवर आता चॅट पिन करण्याचा पर्याय मिळेल, त्यामुळे युजर्स ३ ग्रुप किंवा युजर्स चॅट सहज अॅक्सेस करण्यासाठी लिस्टमध्ये पिन करू शकतील.
- चॅट तुमच्या इनबॉक्समध्ये वर दिसावेत अशी सोय करण्यासाठी चॅट डावीकडे स्वाइप करा किंवा टॅप करून होल्ड करा आणि त्यांनतर “pin” वर टॅप करा.
- तुम्ही कधीही थ्रेड अनपिन करू शकता.
रीड रिसीट
इंस्टाग्रामनं रीड रिसीट बंद करण्याचा टॉगल जोडला आहे, ज्याचा वापर सर्वच किंवा निवडक चॅटसाठी करता येईल.
सर्व चॅट्स साठी रीड अँड रिसीट बंद करण्यासाठी:
- अकाऊंट सेटिंगमध्ये जा
- मेसेज अँड स्टोरी रिप्लायवर टॅप करा.
- शो रीड अँड रिसीट वर टॅप करा.
- रीड अँड रिसीट टॉगल ऑन किंवा ऑफ करा. तुम्ही ही सेटिंग कधीही सहज बदलू शकता.
तसेच तुम्ही तुमचे आवडीचे स्टिकर्स डीएममध्ये सहज मिळावेत म्हणून सेव्ह करून ठेवू शकता. ते वापरण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या स्टिकरवर टच अँड होल्ड करा म्हणजे त्यानंतर ते नेहमीच टॉपला दिसतील.
तसेच आता एखाद्या मेसेजला रिप्लाय देताना तुमच्याकडे स्टिकर्स, गिफ, व्हिडीओज, फोटोज आणि व्हॉईस नोट असे पर्याय असतील. फक्त तुम्हाला ज्या मेसेजला रिप्लाय करायचा आहे त्यावर टच अँड होल्ड करा.
इंस्टग्रामनं नवीन थीम देखील सादर केल्या आहेत ज्यात लव्ह, लॉलीपॉप, अवतार: द लास्ट एअरबाइंडर आणि इतर अनेक थीम्सचा समावेश आहे. चॅटचं थीम चेंज करण्यासाठी चॅटच्या वर असलेल्या नावावर टॅप करा आणि थीम्समध्ये जा, तिथे उपलब्ध असलेल्या एका थीमची निवड करा.