Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 6 मार्च 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

8
राष्ट्रीय मिति फाल्गुन १६, शक संवत १९४५, फाल्गुन कृष्ण एकादशी, बुधवार, विक्रम संवत २०८० सौर फाल्गुन मास प्रविष्टे २३, शब्बान २३, हिजेरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ मार्च २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. एकदशी तिथी दुसऱ्या दिवशी ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्विदशी तिथी प्रारंभ

पुर्वाषाढा नक्षत्र दुपारी २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ. व्यतीपात योग सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. बव करण संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र रात्री ८ वाजून २८ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५६
  • सूर्यास्त: सायं. ६-४५
  • चंद्रोदय: पहाटे ३-२९
  • चंद्रास्त: दुपारी २-३२
  • पूर्ण भरती: सकाळी ७-३७ पाण्याची उंची २.९१ मीटर, रात्री ९-४४ पाण्याची उंची ३.७९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-३६ पाण्याची उंची २.५५ मीटर, दुपारी २-१६ पाण्याची उंची १.२३ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २ मिनिटे ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून ४० मिनिटे ते ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत. सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – हिरव्या मुगाची डाळ गरजवंतांना दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.