Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

IIT Student Commits Suicide: धक्कादायक! आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण..

13

हायलाइट्स:

  • आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
  • पुष्पक ललित संभे (वय २१)असे मृतकाचे नाव.
  • तो बनारस येथे आयआयटीच्या तृतीय वर्षाला शिकत होता.

नागपूर: आयआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वानाडोंगरीतील सातपुडे ले-आऊट येथे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. पुष्पक ललित संभे (वय २१),असे मृतकाचे नाव आहे. तो बनारस येथे आयआयटीच्या तृतीय वर्षाला शिकत होता. (the suicide of an iit student in nagpur the reason for the suicide is unclear)

काही दिवसांपूर्वी पुष्पक, त्याचे वडील व आई महालक्ष्मीपूजनासाठी धामणगाव येथे गेले. गुरुवारी सकाळी पुष्पक हा नागपुरात परतला. दुपारी पुष्पक याने लोखंडी हुकला ओढणी बांधून गळफास घेतला. आईने पुष्पकच्या मोबाइलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आईने शेजाऱ्यांना कळविले. शेजारी त्याच्या घरी गेला आणि त्याने खिडकीतून बघितले असता पुष्पक हा गळफास लावलेला दिसला.

क्लिक करा आणि वाचा- करोनाचे नवे रुग्ण वाढत असल्याने चिंता; राज्याच्या मुख्य सचिवांच्या ‘या’ सूचना

शेजाऱ्याने पोलिसांना व पुष्पकच्या नातेवाइकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने संभे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज नव्या करोना रुग्णांची संख्या घटली; मात्र ‘ही’ चिंताही

पुष्पक याचे वडील एमआयडीसीतील एका कंपनीत तर आई सुतगिरणीत काम करते. दुसरी घटना सक्करदऱ्यातील सेवादलनगर येथे शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आकाश प्रकाश परतेकी (वय ३०) याने दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांची आर्थिक नाकेबंदी; प्राप्तीकर विभागाकडून बँक खाती सील

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.