Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CMF Neckband Pro आणि CMF Buds भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

13

Nothing Phone 2a स्मार्टफोन ५ मार्च, २०२४ लाँच करण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं आपल्या सब ब्रँड CMF अंतगर्त काही प्रोडक्ट सादर केले आहेत. यात CMF Neckband Pro आणि CMF Buds चा समावेश आहे. नवीन बड्स CMF Buds Pro चे डाउन व्हर्जन म्हणता येतील. डिजाइन व्यतिरिक्त फीचर्सच्या बाबतीत Neckband Pro आणि Buds जवळपास सारखेच आहेत. यांची किंमत आणि सर्व फीचर्स पुढे वाचू शकता.

CMF Neckband Pro आणि CMF Buds

सीएमएफ नेकबँड प्रो नेकबँड स्टाइल असलेला ब्लूटूथ वायरलेस ईअरफोन आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी याला IP55 रेटिंग मिळाली आहे. ३-इन-१ सहज साऊंड कंट्रोल करण्यासाठी यात एक स्मार्ट डायल देण्यात आला आहे. यातील ईअरबड मॅग्नेटिकली एकमेकांशी जोडले जातात.

नेकबँड प्रो मध्ये 50dB हायब्रीड अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फीचर मिळतं. यात १३.६mm कस्टम डायनॅमिक ड्राईव्हरचा वापर करण्यात आला. कॉलवर चांगली क्वॉलिटी देण्यासाठी यात AI नॉइज कॅन्सलेशनसह पाच माइक देण्यात आले आहेत. तसेच या वायरलेस इयरफोनमध्ये अल्ट्रा बास टेक्नॉलॉजी मिळते, त्यामुळे युजर्स नथिंग एक्स अ‍ॅपमध्ये पाच बेस लेव्हल अ‍ॅडजस्ट करू शकतील.

नेकबँड प्रो मध्ये एक लोकल ऑडियो इफेक्ट आहे, जो ३६० डिग्री ऐकण्याचा अनुभव देण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. यामुळे हवेचा आवाज देखील कमी येतो. CMF Neckband Pro ANC सह २३ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतो. हा १० मिनिटे चार्ज केल्यावर १८ तासापर्यंत चालतो. CMS Buds मध्ये स्टेम आणि सिलिकॉन ईअर टिप्ससह बड्स प्रो सारख्या इन-ईअर डिजाइनसह आला आहे. याला IP54 रेटिंग मिळाली आहे. TWS इयरफोन एक चौकोनी केसमध्ये येतात, ज्यातब्रँडचा अॅल्यूमीनियम डायल देखील आहे.

सीएमएफ बड्स मध्ये १२.४ mm बायो-फायबर आणि कस्टम टीपीयू ड्राईव्हर देण्यात आला आहे. ट्रांसपरंसी मोडसह 42dB ANC मिळतो. TWS इअरफोन Dirac द्वारे ट्यून करण्यात आले आहेत. याची बॅटरी ANC सह ५.६ तास चालेल. सीएमएफ नेकबँड प्रो आणि बड्स दोन्ही ब्लूटूथ ५.३ आणि ड्युअल-डिवाइस कनेक्टिव्हिटीसह येतात. यात गुगल फास्ट पेयर आणि मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट पेयर आहे.

किंमत

CMF Neckband Pro भारतात १,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. CMF Buds ची किंमत २,४९९ रुपये आहे. दोन्ही डिवाइस Black, White आणि Orange कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील. दोन्हीची विक्री Flipkart आणि Myntra वरून केली जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.