Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi 14 Ultra Price
शाओमी १४ अल्ट्रा ९९,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला आहे. ही १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज असलेल्या एकमेव मॉडेलची किंमत आहे. हा मोबाइल आज ७ मार्चपासून रिर्जवेशनसाठी तर १२ एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
या फोन सोबत ३ महिन्याचं YouTube Premium सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. तसेच ICICI Bank कार्डचा वापर केल्यावर ५,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. कंपनीनं ५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. ब्रँड वन टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि आउट ऑफ वॉरंटी फोनवर १ वेळ फ्री रिपेयर सर्व्हिस देखील मिळेल.
Xiaomi 14 Ultra Specifications
शाओमी १४ अल्ट्रा १४४० × ३२०० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.७३ इंचाच्या क्वॉडएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाइल असेलेली ही स्क्रीन एलटीपीओ अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. या डिस्प्लेवर डॉल्बी व्हिजन, ३०००निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर१०+ असे फीचर्स देखील मिळतात.
Xiaomi 14 Ultra अँड्रॉइड १४ सह लाँच झाला आहे जो हायपरओएससह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा ४नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला पावरफुल स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. हा ऑक्टाकोर प्रोसेसर ३.३गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. तसेच हेव्ही गेमिंगसाठी फोनमध्ये वेपर कूलिंग चेंबर सिस्टम देण्यात आली आहे ज्यामुळे हीटिंग जास्त होत नाही.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP Sony LYT900 मेन कॅमेरा देण्यात आला आहे, जो १″ सेन्सर आहे तसेच OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअपमध्ये ३.२x झूम व ७५mm फोकल लेन्स असलेला 50MP Sony IMX858 सेन्सर + ५x झूम व १२०mm फोकल लेन्स 50MP Sony IMX858 + 50MP ultra-wide-angle लेन्स देखील आहे. तसेच सेल्फी काढण्यासाठी Xiaomi 14 Ultra मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
पावर बॅकअपसाठी Xiaomi 14 Ultra मध्ये ५,३००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये ९०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनमध्ये ८०वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील आहे.