Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lenovo Yoga Slim 7i भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

8

Lenovo Yoga Slim 7i भारतात लाँच झाला आहे. हा लॅपटॉप AI-पावर्ड फीचर्ससह येतो. यात पावर देण्यासाठी इंटेलची दमदार चिप देण्यात आली आहे. यात OLED डिस्प्लेसह दमदार बॅटरी आणि 1TB इंटरनल स्टोरेज मिळते. त्यामुळे भारतीय बाजारात HP, Asus आणि Acer सारखे ब्रँडच्या लॅपटॉपना चांगली टक्कर मिळेल. याआधी लॅपटॉप ब्रँड लेनोवोनं योगा स्लिम ६ आणि स्लिम ६आय सादर केला होता.

Lenovo Yoga Slim 7i चे स्पेसिफिकेशन

लेनोवो योगा स्लिम ७आय मध्ये १४ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन १९२० x १२०० पिक्सल, पीक ब्राइटनेस ४०० निट्स आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ आहे. लॅपटॉपच्या डिस्प्लेला Dolby Vision आणि DisplayHDR True Black 500 चा सपोर्ट मिळला आहे. तसेच यात Eyesafe आणि TÜV Rheinland Low Blue Light सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे.

प्रोसेसर आणि OS

स्मूद फंक्शनिंगसाठी योगा स्लिम ७आय मध्ये Intel Core Ultra 7 प्रोसेसर, Intel Arc ग्राफिक, इंटेल इवो, 32GB रॅम आणि 1TB एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज ११ प्लॅटफॉर्मवर चालतो.

अन्य स्पेक्स

Lenovo Yoga Slim 7i मध्ये व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी १०८०p रिजोल्यूशन असलेला फुल एचडी कॅमेरा मिळतो, जो टाइम-ऑफ-लाइट आणि ई-शटरसह आला आहे. चांगल्या साउंडसाठी लॅपटॉपमध्ये ४ स्पिकर आणि Dolby Atmos देण्यात आला आहे. यात Amplifier देखील आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये फुल-साइज कीबोर्ड आणि बटन असलेला मल्टी-टच टचपॅड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाईप-ए आणि टाईप-सी पोर्ट सारखे फीचर देण्यात आले आहेत.

Lenovo Yoga Slim 7i ची किंमत

Lenovo Yoga Slim 7i ची किंमत १,०४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यावर ५,९९९ रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआय मिळत आहे. त्याचबरोबर, १० हजार पर्यंतचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ऑफलाइन स्टोर आणि ई-कॉमर्स वेबसाइटवरून विकत घेता येईल.

गेल्या महिन्यात आला ट्रान्सपरंट लॅपटॉप

लेनोवोनं गेल्या महिन्यात मोबाइल वर्ल्ड कांग्रेस इव्हेंटमध्ये ट्रान्सपरंट लॅपटॉप Lenovo ThinkBook लाँच केला होता. या लॅपटॉपच्या डिस्प्लेच्या आरपार सहज पाहता येतं. परंतु अद्याप हा बाजारात अधिकृतपणे सादर करण्यात आलेला नाही. अशी चर्चा आहे की हा २०२४ च्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.