Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ३९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ८४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ८० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ८० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख २० हजार ३१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९१९ इतकी आहे. काल ही संख्या ४८ हजार ४५१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ६९९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ७ हजार ३९६ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ३ हजार ८१३ वर गेला आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार २३० अशी आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार २९५ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ५१३ इतकी किंचित वाढली आहे.
क्लिक करा आणि वाचा- शिर्डी संस्थानचे नवे विश्वस्त मंडळ बेकायदेशीर?; कोर्टात देणार आव्हान
मुंबईत उपचार घेत आहेत ५,७१९ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ७१९ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ९३२ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७६०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९९३ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘शरद पवारांना मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही’; मुनगंटीवारांचे टीकास्त्र
२,८३,४४५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६८ लाख ७४ हजार ४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख १८ हजार ५०२ (११.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८३ हजार ४४५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ८१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.