Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुगलमध्ये झाली चोरी; माजी कर्मचाऱ्याने दोन चिनी कंपन्यांना दिली ‘AI सिक्रेट्स’

9

गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिक्रेट्स

विश्वास बसणार नाही, पण असाच काहीसा प्रकार घडला आहे. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयशी संबंधित सिक्रेट्स चोरली आणि ती दोन चिनी कंपन्यांना दिली. त्या कंपन्यांसाठी तो छुप्या पद्धतीने काम करत होता. लिनवेई डिंग नावाच्या व्यक्तीला कॅलिफोर्नियामधून बिझिनेस सिक्रेट चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुगलनेच हि तक्रार दाखल केली होती. दोषी आढळलेल्या व्यक्तीवर एक-दोन नव्हे, तर चार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

आरोपी चीनमधील

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लिनवेई डिंग हे मूळचे चीनचे आहेत. त्यांनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले. गुगलच्या मूळ कंपनी ‘अल्फाबेट’कडून त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित बिझिनेस सिक्रेट चोरली आणि ती दोन चिनी कंपन्यांना दिली असा आरोप आहे. आरोपीला कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली आहे . आरोपीचे वय 38 वर्षे आहे. त्याच्यावर बिझिनेस सिक्रेट चोरण्याचे चार आरोप आहेत. डिंगने गुगलच्या ‘सुपरकंप्युटिंग डेटा सेंट’रशी संबंधित माहिती बेकायदेशीरपणे मिळवली, असा आरोप आहे. त्या सेंटरमध्ये मोठ्या एआय मॉडेल्सना मशीन लर्निंगद्वारे प्रशिक्षण दिले जाते.

चिनी टेक कंपनीने दिली होती चीफ टेक्नॉलॉजी पदाची ऑफर

ॲटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले की,आमची बिझिनेस सीक्रेट आणि गुप्तचरांची चोरी खपवून घेतली जाणार नाही.
गुगलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तीन वर्षांनी 2019 मध्ये डिंगने आपले रंग दाखवायला सुरुवात केली, असा आरोप आहे. त्याने एआय सिक्रेट्स चोरण्यास सुरुवात केली. एका चिनी टेक कंपनीने आरोपीला चीफ टेक्नॉलॉजी पदाची ऑफर दिल्याने ही चोरी सुरू झाली. आरोपींनी मे 2023 मध्ये 500 हून अधिक सीक्रेट फाइल अपलोड केल्याचा आरोप आहे.

लॅपटॉप जप्त करताच उघडकीस आले सत्य

रिपोर्टनुसार, डिंगने चिनी कंपनीला माहिती दिली आणि स्वतःची कंपनी बनवून कामही सुरू केले. एका चॅट ग्रुपमध्ये डॉक्युमेंट शेअर करून डिंगने गुगलच्या दहा हजार कार्ड कॉम्प्युटेशनल पॉवर प्लॅटफॉर्मबद्दल माहिती असल्याचे सांगितले होते. फक्त त्यांना कॉपी करणे आणि अपग्रेड करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले होते. गुगलला या प्रकरणाची माहिती मिळाली आणि डिंगने राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी कंपनीने त्याचा लॅपटॉप जप्त केला. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गुगलने गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला. तथापि, डिंगला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2,50,000 डॉलरपर्यंतचा दंड होऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.