Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खंडनीसाठी अपहरण करणारे युनीट १ च्या तावडीत सापडले…

9

अपहरण करून १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इर्टिगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/-  रू. काढून घेतले, तसेच फिर्यादीला धमकावून त्यांचे पत्नीकडून बारा लाखांची रक्कम  खंडणी उकळुन फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास, मध्यप्रदेश येथे सोडले होते, त्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुरनं – ५४ / २०२४ भादविक ३६३, ३६४, ३८६, ३८७, ३९५ व आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त,गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा . डॉ. सिताराम कोल्हे, यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना वेळोवळी सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
सदर गुन्ह्यांत  गुन्हेशाखा युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावर भेट देवुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना सपोनि हेमंत तोडकर पोहवा महेश साळुके, पोशि राहुल पालखेडे अशांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करून सदर गुन्हा हा तुषार खैरणार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न करून सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक  मधुकर कड यांना देवुन त्यांनी दोन पथक तयार करून त्यांना आरोपी पकडण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट १ चे सपोनि हेमंत तोडकर यांचेसह पोहवा महेश साळुंके,नापोशि मिलिंदसिंग
परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ तसेच श्रेणी पोउनि रविंद्र
बागुल यांचेसह पोहवा विशाल काठे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण,नापोशि  प्रशांत मरकड, विशाल देवरे असे दोन पथके तयार करून खाना केले होते.

सपोनि हेमंत तोडकर व पथक यांनी अंबड लिंक रोड, दत्तमंदिराजवळ इसम नामे नाव आदित्य एकनाथ सोनवणे वय २४ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक, यास पकडुन त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन यामाहा कंपनीची मोपेड मोटारसायकल अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, दोन सोन्याच्या कानातील रिंगा, रोख रक्कम रूपये २९,५००/- रु. असा एकुण १,५९,०००/- रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत केला.

पोउनि रविंद्र बागुल यांचे पथकाने आरोपी नामे १) तुषार केवल खैरनार वय २८ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्ट, म्हसरूळ नाशिक, २) अजय सुजीत प्रसाद वय २४ वर्षे रा. अंबड लिंकरोड, नाशिक अशानां म्हसरूळ लिंक रोड येथे सापळा लावुन पकडले,

त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यातुन शेवरलेट कंपनीची कुझ कार, व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ३,८७,०००/- रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपीतांकडुन एकुण ६,१६,०००/- रूपये किमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीस पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत पाहिजे आरोपींचा शोध घेत आहोत
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक,  प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा,डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि  विष्णु उगले,  चेतन श्रीवंत,श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, नापोशि प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड, संदिप भांड, योगीराज गायकवाड, मपोशि अनुजा येलवे, चालक सफौ किरण शिरसाठ, पोशि समाधान पवार यांनी केलेली आहे. तसेच सदर गुन्हा उघड आणण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शाखा सफौ जाकिर मिझा,
पोहवा राणे,पोशि भुषण देवरे यांनी योग्य ते सहकार्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.