Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात नरसापूर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर नसल्याने ग्रामस्थांचे हाल.
- गेल्याच महिन्यात या नदीत एक ग्रामस्थ वाहून गेल्याची घटना घडली आहे
- करपरा शववाहिनी नदीत फसल्याने अखेर मृतदेह बैलगाडीत टाकून न्यावा लागल्याची घटना १७ सप्टेंबरला घडली.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात नरसापूर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर आजपर्यंत पूल उभारण्यात न आल्याने ग्रामस्थांना विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. येथील ग्रामस्थांना १७ सप्टेंबर रोजी अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. औरंगाबादमधील एका रुग्णालयात येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नदीवर पूल नसल्याने तिचा मृतदेह शेवटी बैलगाडीत लादून गावात आणावा लागला. येथील नदीवर पूल बांधण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी असून, या मागणीवर शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. (as there was no bridge over the river the villagers had to carry the dead body by bullock cart in narsapur of parbhani district )
१७ सप्टेंबर या दिवशी नरसापूर गावातील भीमराव शेळके यांचा औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शववाहिनीतून आणण्यात आला. मात्र शववाहिनी नदीपात्रात आल्यानंतर फसली. याचे कारण म्हणजे या नदीला पाणी थोडे असले तरी चिखल मोठ्या प्रमाणात आहे. शववाहिनी हलवण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिल्यानंतरही काही उपयोग होऊ शकला नाही. शेवटी त्यांचा मृतदेह शववाहिनीतून काढून तो बैलगाडीत लादून गावात नेण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा- जयंत पाटलांसोबत एकाच गाडीत, एकाच व्यासपीठावर; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
करपरा नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांमध्ये गावकऱ्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात नदी ओलांडताना एक ग्रामस्थ वाहून गेल्याची घटना अजूनही ताजी आहे.
गेल्या वर्षी अशीच एक घटना ११ ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती. एका ८ वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला होता. त्यावेळी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने करपरा नदीला पूर आला होता. सर्पदंश झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात येण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागला. गावातील १० ते १५ तरुणांनी, नागरिकांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुरातून दोरीच्या सहाय्याने नदी ओलांडून त्या मुलास जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, तो सुखरूप घरी आला.
क्लिक करा आणि वाचा- अपंगांना बौद्धिक क्षेत्रात सन्मान मिळाल्याचा अधिक आनंद: सोनाली नवांगुळ
आमच्या गावात अनेकदा लोकप्रतिनिधी येतात. मात्र ते आश्वासने देण्यापलिकडे दुसरे काहीही करत नाहीत. आमची विनंती आहे की सरकारने त्वरीत लक्ष घालून या नदीवर लवकरात लवकर पूल बांधावा, असे येथील एका ग्रामस्थाने सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- ‘मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य