Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनेक आकर्षक पर्याय
कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार, नवीन फीचर युजर्सना फॉरमॅटिंगसाठी हेडिंग, सबहेडिंग, बोल्ड, इटैलिक्स, स्ट्राइकथ्रू, इन्डेंटेशन, न्यूमेरिकल आणि बुलेटेड लिस्टसारखे अनेक पर्याय देते.या फीचरमध्ये दिलेला सर्वात खास पर्याय म्हणजे ‘ऑडिएंस कंट्रोल फंक्शनैलिटी’. त्याच्या मदतीने, युजर्स त्यांचा लेख (आर्टिकल ) कोण पाहू शकतात आणि कोण पाहू शकत नाहीत हे ठरवू शकतात. यामध्ये, संपूर्ण X प्लॅटफॉर्मवर लेख शेअर करण्याव्यतिरिक्त, कंपनी सिलेक्टेड प्रेक्षकांपर्यंत कन्टेन्ट लिमिटेड करण्याचा ऑप्शन देखील देत आहे. नवीन फीचरच्या सहाय्याने लेख तयार करणे, एडिट करणे आणि डिलीट करणे या प्रोसेसबद्दल माहिती देत आहोत.
याप्रमाणे लेख (आर्टिकल ) तयार करा
- सर्वप्रथम, साइड नेव्हिगेशन पॅनेलच्या मदतीने लेख (आर्टिकल ) पर्यायावर जा.
- लेख लिहायला सुरुवात करण्यासाठी ‘राईट’ वर क्लिक करा.
- लेख तयार केल्यानंतर, ‘डन’ वर क्लिक करा आणि आर्टिकल पब्लिश करा. तुम्ही तुमच्या X प्रोफाइलमध्ये दिलेल्या आर्टिकल टॅबवर क्लिक करून हे पाहू शकता.
असे करा आर्टिकल एडिट
- आर्टिकल एडिट करण्यासाठी, तुम्हाला जे आर्टिलक एडिट करायचे आहे त्या आर्टिकलच्या टॅबवर जा.
- थ्री डॉट मेनूवर टॅप करा आणि एडिट आर्टिकल पर्याय निवडा.
- एडिटला कन्फर्म करा. हे काही काळासाठी तुमचे आर्टिकल अनपब्लिशड करेल.
- यानंतर आर्टिकलमध्ये आवश्यक ते बदल करून ते पुन्हा पब्लिश करा.
असे डिलीट करा आर्टिकल
- तुम्हाला आर्टिकल टॅबमधून हटवायचा असलेले आर्टिकल निवडा.
- थ्री डॉट मेनूवर क्लिक करा आणि डिलीट पर्याय निवडा.
- असे केल्यावर तुमचे आर्टिकल डिलीट होईल.
कंपनीने हे फिचर विशेषत: X च्या प्रीमियम प्लस युजर्ससाठी आणि व्हेरीफाईड ऑर्गनायझेशन साठी आणले आहे.