Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘ॲपल’ देतेय ‘सॅमसंग’ आणि’ एलजी’ला 23 हजार कोटी रुपये; जाणून घ्या कारण

8

‘Apple’ आणि ‘Samsung’ यांचे संबंध व्यवसाय स्पर्धक म्हणून वरवर जरी ताणलेले दिसत असले तरी या दोघांमधील संबंध खऱ्या अर्थाने
प्रोफेशनल (व्यावसायिक ) असल्याचे लक्षात येते. ‘Apple iPad’, ‘iPhone’, ‘LG’, ‘Sony’ आणि ‘iPad Pro’ मॉडेल यांसारख्या आपल्या उत्पादनांसाठी ‘OLED डिस्प्ले’ वापरतात. यात Apple ने आपल्या नवीन ‘iPad Pro’ साठी S’amsung’, ‘LG’ आणि ‘Sony’ कडून ‘OLED डिस्प्ले’चा पुरवठा 23 हजार कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

‘ॲपल’ आणि ‘सॅमसंग’चे बिझिनेस रिलेशन

‘ॲपल’ आणि ‘सॅमसंग’ या मोठ्या टेक कंपन्या आहेत. स्वत:ला चांगले दाखवण्यासाठी दोघांमध्ये प्रयत्न सुरूच असतात. अशा स्थितीत दोघांमध्ये संघर्ष होतो. पण दुसरीकडे ‘ॲपल’ ‘सॅमसंग’ला भरपूर पैसे देत आहे. अशा वेळी प्रश्न पडतो की यांच्यातील संबंध नक्की कसे आहेत.
तर, हे एक बिझनेस रिलेशनशिप आहे, जिथे ‘Apple’ आपले’ iPad’ आणि ‘iPhone’ सारखे प्रोडक्ट बनवण्यासाठी ‘Samsung’ चे पार्टस् वापरते.

का देते ‘ॲपल’ पैसे

काही लोकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की ‘Apple iPhone’ सारख्या उपकरणांमध्ये ‘Samsung’ आणि ‘LG’ डिस्प्लेचा वापर केला जातो. तसेच ‘सोनी’ आणि ‘सॅमसंग’चे कॅमेरे वापरले जातात. या स्मार्टफोनच्या पार्ट्सच्या बदल्यात ॲपल हे सॅमसंग, सोनी आणि एलजीला पैसे देते. असे मानले जात आहे की ‘Apple’ लवकरच आपले नवीन ‘iPad Pro’ मॉडेल लॉन्च करेल, ज्यामध्ये ‘OLED डिस्प्ले’ असेल. आगामी ‘iPad Pro’ मॉडेलमध्ये ‘OLED डिस्प्ले’ दिला जाऊ शकतो. ‘OLED स्क्रीन’ ‘LCD पॅनेल’पेक्षा खूप चांगली आहे.

२३ हजार कोटी रुपये दिले

कोरिया इकॉनॉमिक डेलीच्या अहवालानुसार, ‘सॅमसंग डिस्प्ले’ आणि ‘LG डिस्प्ले’ नवीन 11-इंच आणि 12.9-इंच ‘iPad Pro ‘साठी Apple ला 4 ते 4.5 दशलक्ष OLED पॅनल्स पुरवणार आहेत. आकडेवारीनुसार, 11 इंच आणि 12.9 इंच ‘OLED पॅनल्स’ची किंमत प्रति युनिट 290 डॉलर ते 390 डॉलर असू शकते. अशा परिस्थितीत ‘ॲपल’ने नवीन ‘आयपॅड प्रो डिस्प्ले’साठी सॅमसंग आणि ‘एलजी’ला एकूण 2.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23 हजार कोटी रुपये दिले असतील अशी माहिती आहे.

‘ॲपल’च्या या प्रोजेक्टला लागला ब्रेक

टेक कंपनी ‘ॲपल’ ही अनोखी उत्पादने बनवण्यासाठी ओळखली जाते. ‘ॲपल’चा असाच एक मेगा प्रोजेक्ट इलेक्ट्रिक कार बनवण्याचा होता.
ईटीच्या अहवालानुसार, ‘ॲपल’ने इलेक्ट्रिक कार बनवण्याची आपली अनेक वर्षे जुनी योजना रद्द केली आहे. या प्रकल्पावर सुमारे दोन हजार कर्मचारी काम करत होते. सध्या ॲपल ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर जोमाने काम करत असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत सर्व कर्मचारी जनरेटिव्ह एआयवर काम करतील. ‘Apple’ कार प्रकल्पावर सुमारे 100 हार्डवेअर अभियंते आणि कार डिझाइनर काम करत होते. ॲपलने 2014 च्या सुमारास इलेक्ट्रिक कार बनवण्याचे काम सुरू केले होते. यामध्ये इंटिरिअर आणि व्हॉइस इनेबल्ड नेव्हिगेशन सिस्टीमचे काम पूर्ण झाले होते. ‘ॲपल’ला टेस्लासारखी ऑटोमॅटिक कार बनवायची होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.