Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, Nord CE 4 5G १ एप्रिलला होईल भारतात लाँच

9

वनप्लस फॅंससाठी आनंदाची बातमी आली आहे. कंपनी भारतात आपला नवीन मोबाइल फोन सादर करणार आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की येत्या १ एप्रिलला OnePlus Nord CE 4 5G फोन भारतात लाँच करण्यात येईल. फोनचे नाव आणि लाँच डेट अनाउंस करताना वनप्लस नॉर्ड सीई ४ चे फोटो व महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्सची शेयर करण्यात आले आहेत, जे तुम्ही पुढे पाहू शकता.

OnePlus Nord CE 4 इंडिया लाँच डिटेल

वनप्लस नॉर्ड सीई ४ ५जी फोन १ एप्रिलला भारतात लाँच होईल. या तारखेला कंपनी एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन करणार आहे, ज्याच्या मंचावरून नवीन वनप्लस मोबाइल भारतीय बाजारात येईल. OnePlus Nord CE4 इंडिया लाँच इव्हेंट १ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल तसेच या मंचावरुन फोनची किंमत, सेलची माहिती तसेच ऑफर्सची माहिती दिली जाईल.
हे देखील वाचा: फोन सोबत जबरदस्त अ‍ॅक्सेसरीज मोफत; OnePlus 12R Genshin Impact Edition भारतात लाँच

फोन लाँच पूर्वीच कंपनीनं सांगितले आहे की नॉर्ड सीई४ Dark Chrome आणि Celadon Marble कलरमध्ये विकला जाईल. या मोबाइलचा प्रोडक्ट पेज वनप्लस वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर पण लाइव्ह करण्यात आलं आहे म्हणजे युजर्स OnePlus Nord CE 4 अ‍ॅमेझॉन वरून खरेदी करू शकतील.

OnePlus Nord CE 4 प्रोसेसर

कंपनीनं सांगितलं आहे की वनप्लस नॉर्ड सीई४ ५जी फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 octa-core प्रोसेसर वर लाँच केला जाईल. हा ४nm फॅब्रिकेशन्सवर बनलेला चिपसेट आहे जो २.६३GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. .

OnePlus Nord CE 4 चे लीक स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 4 मध्ये १.५के पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्ले मिळणार असल्याचे लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. ही स्क्रीन १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल. फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड सीई४ ५जी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार ही लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह येईल.
Nord CE 4 5G स्मार्टफोनमध्ये सेल्फी तसेच विडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीक नुसार हा मोबाइल फोन दमदार ५,५००एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.