Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

6 तासांत दोन लाँच; ‘SpaceX’ ने 46 सॅटेलाईट पाठवले अवकाशात

10

स्पेसेक्स कंपनीने केलेले सॅटेलाईट लॉन्च फ्लोरिडा, अमेरिकेतील केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून झाले. ‘फाल्कन 9’ रॉकेटच्या मदतीने हे उपग्रह (सॅटेलाईट) सोडण्यात आले.

सोशल मीडियावर सॅटेलाईट लाँन्चची पुष्टी

‘स्पेसएक्स’ने पहिल्या लाँचमध्ये, 23 स्टारलिंक सॅटेलाईट लो-अर्थ ऑर्बिटमध्ये वितरित केले. दुसऱ्यांदाही 23 सॅटेलाईट अवकाशात पाठवण्यात आले.
वृत्तानुसार, आज पहाटे 4:35 वाजता 23 सॅटेलाईटचा पहिला सेट लाँन्च करण्यात आला. लाँन्चनंतर अगदी 8.5 मिनिटांनी, फाल्कन 9 रॉकेटचा पहिला टप्पा पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आला. तो अटलांटिक महासागरात ‘स्पेसएक्स’च्या ड्रोन जहाजावर उतरला. सुमारे एक तासानंतर, ‘SpaceX’ ने सोशल मीडियावर पुष्टी केली की, सर्व 23 स्टारलिंकसॅटेलाईट तैनात केले गेले आहेत.त्यानंतर, दुसरे लाँन्च सकाळी 9:39 वाजता करण्यात आले आणि 23 स्टारलिंक उपग्रहांचा दुसरा सेट अवकाशात पाठवण्यात आला.

‘स्पेसएक्स’ प्रोजेक्टचे स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस

‘स्पेसएक्स’ प्रोजेक्टच्या अंतर्गत जगभरात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेसह जगातील काही देशांमध्ये स्टारलिंक सेवा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातही कंपनीने स्टारलिंक सॅटेलाईट पृथ्वीच्या निम्न कक्षेत पाठवले होते. हा ट्रेंड कायम राहणार आहे कारण कंपनीचे 12 हजार सॅटेलाईट लाँच करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या त्याने 5 हजारांहून अधिक स्टारलिंक सॅटेलाईट लाँच केले आहेत.

भारतातही येणार स्टारलिंक

अलीकडेच एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंपनी अनेक वर्षांपासून भारतीय युजर्ससाठी ही सेवा सुरू करू इच्छित आहे. एकदा त्यांनी आगाऊ बुकिंगही सुरू केले, पण सरकारी परवानगीअभावी त्यांना माघार घ्यावी लागली. आता DoT (दूरसंचार विभाग) ने स्टारलिंकला ‘ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन लायसन्स’ (GMPCS) दिल्याचे सांगितले जाते, जे सॅटेलाईट इंटरनेटसाठी महत्त्वाचे आहे.मात्र, हा परवाना मिळाल्यानंतरही काही नियामक मंजुरी आवश्यक असतील, ज्या स्टारलिंकला घ्याव्या लागतील. त्यानंतरच कंपनी देशात आपली व्यावसायिक सेवा सुरू करू शकेल.

सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिसच्या स्पर्धेत अमेझॉनही उतरणार

स्टारलिंकप्रमाणेच Amazon कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या प्रोजेक्ट कुइपरचे 3,236 LEO सॅटेलाईटद्वारे इंटरनेट वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे सॅटेलाईट अद्याप प्रक्षेपित झालेले नाहीत. यापैकी निम्मे सॅटेलाईट 2026 पर्यंत लाँच केले जाऊ शकतात. ॲमेझॉनची ई-कॉमर्स सेवा आणि प्राइम व्हिडीओ सेवेलाही ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू झाल्याने चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, Amazon कथितरित्या 1 Gbps पर्यंत स्पीडसह इंटरनेट ऑफर करेल. त्याचे ‘परवडणारे ब्रॉडबँड’ देशभरात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या भागात इंटरनेट सुविधा नाही अशा भागातही ते पोहोचेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.