Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला iQOO Z9 5G! कमी किंमती १६जीबी पर्यंत रॅम

8

आयकूनं भारतीय युजर्ससाठी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z9 5G लाँच केला आहे. ब्रँडचा हा फोन २०,००० रुपयांच्या रेंज मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० चिप, २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, ८जीबी एक्सटेंडेड रॅम सपोर्ट, १८००निट्स पीक ब्राइटनेस असलेला ६.६७ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले सारखे अनेक फीचर्स देतो. चला, जाणून घेऊ किंमत आणि स्पेसिफिकेशन.

iQOO Z9 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीनं iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये आणला आहे. ज्यात ८जीबी रॅम व १२८GB स्टोरेज आणि ८जीबी रॅम+ २५६ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. फोनच्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर २५६ जीबी स्टोरेज २१,९९९ रुपयांमध्ये मिळेल.
हे देखील वाचा: वनप्लसचं दुकान बंद करणार का iQOO Neo 9 Pro? २४जीबी रॅम आणि पावरफुल चिपसेटसह फास्ट चार्जिंगही आहे

कंपनी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डच्या खरेदीवर २,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट ऑफर करत आहे. या ऑफर नंतर बेस मॉडेल १७,९९९ रुपये आणि टॉप मॉडेल १९,९९९ रुपयांमध्ये मिळेल. इतकेच नव्हे तर फोनवर ३ महिन्यांच्या नो कॉस्ट EMI चा ऑप्शन देखील आहे. डिवाइसची विक्री १४ मार्चपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि आयकूच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु होईल. फोनसाठी युजर्सना ब्रश्ड ग्रीन आणि ग्राफीन ब्लू असे दोन कलर ऑप्शन मिळतील.

iQOO Z9 5G चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Z9 5G फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात २४०० x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३९४पीपीआय पिक्सल डेंसिटी, ९१.९०% स्क्रीन टू बॉडी रेश्यो सारखे फीचर्स मिळत आहेत. त्याचबरोबर स्क्रीनच्या सुरक्षेसाठी डीटी स्टार २ प्लस ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. iQOO Z9 मध्ये कंपनीनं ऑक्टा कोर ६४ बिट मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० ५जी मोबाइल प्लॅटफॉर्मवर बेस्ट चिपसेटचा वापर केला आहे. हे प्रोसेसर २.८गिगाहर्टझच्या क्लॉक स्पीडवर चालतो तर ग्राफिकसाठी आर्म माली ६१० जीपीयू मिळतो.

डाटा सेव्ह करण्यासाठी iQOO Z9 5G मध्ये दोन स्टोरेज ऑप्शन सादर करण्यात आले आहेत. ज्यात ८जीबी एलपीडीडीआर४एक्स सोबत १२८जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅमसह २५६जीबी यूएफएस २.२ इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. त्याचबरोबर फोनमध्ये ८जीबी एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील मिळतो, ज्याच्या मदतीनं युजर्स १६जीबी पर्यंत रॅम पावर वापर करू शकतात. इतकेच नव्हे तर स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते.

२०,००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये येणारा iQOO Z9 5G स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सपोर्टसह ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सलची बोकेह कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी युजर्सना १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

iQOO Z9 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी ४४वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन ६७.८ तास म्यूजिक टाइम देऊ शकतो. इतर फीचर्स पाहता iQOO Z9 5G डिव्हाइसमध्ये आयपी५४ रेटिंग, ड्युअल स्टूडियो स्पिकर, ड्युअल सिम ५जी, वाय-फाय६, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर असे अनेक फीचर्स मिळतात.

अखेरीस iQOO Z9 5G ची ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर लाँच करण्यात आला आहे. मोबाइल सह कंपनी २ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि ३ वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.