Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Realme 12 Pro Price
रियलमी १२ प्रो १२जीबी रॅम मॉडेल कंपनीनं २८,९९९ रुपयांमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत या व्हेरिएंटवर ४,००० रुपयांचा बँक डिस्कांउट दिला जात आहे ज्याच्या अंतर्गत HDFC, ICICI, Axis आणि SBI Debit Card चा वापर केल्यावर फोन २४,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. मोबाइलची विक्री १५ मार्चपासून कंपनी वेबसाइट व फ्लिपकार्टवर सुरु होईल.
Realme 12 Pro Specifications
रियलमी १२ प्रो ५जी फोनमध्ये २४१२ x १०८० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.७ इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा कर्व्ड ओएलईडी स्क्रीन आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. तसेच यात २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, ९५०निट्स ब्राइटनेस आणि २१६० हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. हा रियलमी मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
Realme 12 Pro 5G अँड्रॉइड १३ वर लाँच झाला आहे जो रियलमी वनयुआय ५.१ सह येतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ४नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो २.२गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो ७१० जीपीयू आहे.
Realme 12 Pro 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात OIS टेक्नॉलॉजी असलेला ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८८२ मेन सेन्सर देण्यात आला आहे जो ३२ मेगापिक्सल आयएमएक्स७०९ टेलीफोटो लेन्स तसेच ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह मिलकर चालतो. तसेच सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
पावर बॅकअपसाठी रियलमी १२ प्रो ५जी फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल ६७वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. फोन यूएसबी टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो.