Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अकोला येथील कुख्यात गुंड ईमरान याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही,वर्षाभरासाठी जेलमधे रवानगी…
कुख्यात सराईत गुंड इमरान खान रहिम खान एम पी डी ए कायद्यान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द,अकोला पोलिसांची ९ वी कार्यवाही….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील खिडकीपुरा, जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड इमरान खान रहिम खान वय २९ वर्ष याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचविणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे,दंगा करणे त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता.
तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड इमरान खान रहिम खान, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर
बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १४/०३/२०२४ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून इमरान खान रहिम खान याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १४/०३/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे, पोहवा ज्ञानेश्वर सैरिसे,पोशि. उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पोलिस स्टेशन जुने शहर येथील पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोहवा. संतोष मेंढे, पोशि स्वप्निल पोधाडे यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.