Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरफोडी,जबरी चोरी करणारी टोळी राणाप्रताप नगर पोलिसांनी केली जेरबंद…,

12

राणाप्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी – घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद…

नागपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून जबरी चोरी, घरफोडी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने अटक करून १५ गुन्हे उघडकीस आणण्यात राणाप्रताप नगर पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्यांच्याकडुन १) व्हिओ कंपनीचा मोबाईल किं १०,०००/-रु. २) धातुचा पाईप कि.१००/- रु. ३) एक छोटा लोखंडी चाकु कि.५०/- रु. ४) होंडा कंपनीची काळया रंगाची शाईन गाडी क्र. MH-31-DQ-8479 किं.३०,०००/- रु. ५) एक पांढ-या रंगाची ॲक्टीवा गाडी क्र.MH-40-AP-8605 किं. १२,०००/- रु. ६) एक पांढ-या रंगाची ॲक्टीवा गाडी क्र.MH-31-EX-3541 किं.अं. ३०,०००/-रू ७) २१००/-रु.सिगारेटचा मुद्देमाल ८) एक काळया रंगाची हीरो होंडा स्प्लेंडर गाडी क्र.MH-31-DF-9660 किं.अं.१०,०००/-रु. ८) आयफोन कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल फोन किं.२०,०००/- रु. ९) वनप्लस कंपनीचा मोबाईल फोन किं १२,०००/- रु. आणि गुन्ह्याच्या व्यतिरिक्त जप्त करण्यात आलेला मुद्देमाल –

१) विवो कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल किं.अं. १०,०००/-रु.

२) ओपो कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल किं.अं. १०,०००/-रु.

३) विवो कंपनीचा स्काय ब्लु कलरचा मोबाईल किं.अं. १०,०००/-रु.

४) रियलमी कंपनीचा स्काय ब्लु कलरचा मोबाईल किं.अं. १३,०००/-रु.

५) एक नारझो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल किं.अं. ८,०००/-रु. असा एकूण ०२,०७,२५०/ रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी-जितेंद्र वसंतराव पालकर (वय ५४ वर्षे ,रा.प्लॉट नं.२८, गुडधे लेआउट, नागोबा मंदीर जवळ, भामटी, पोलिस ठाणे प्रतापनगर नागपुर  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – राजु बापुराव वाघमारे (वय १९ वर्षे), रा.राममंदीर जवळ, वैशाली नगर पोलिस ठाणे एमआयडीसी नागपुर, प्रविण रामरतन शर्मा, (वय १८ वर्षे) रा.इंदिरामाता नगर, नागपुर आणि ०५ विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावर १०८/२४ कलम ३७९ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिस ठाणे प्रतापनगर नागपुर येथे फिर्यादी नामे जितेन्द्र वसंतराव पालकर वय ५४ वर्ष रा. प्लॉट नं. २८, गुडघे लेआउट, नागोबा मंदीर यांनी रिपोर्ट दिली की, त्यांची मुलगी दिनांक ०८/०३/२०२४ चे सांयकाळी ०७:०० वा दरम्यान ॲक्टीवा गाडी क्र.MH-31-FH-6772 ग्रे रंगाची, किं. ३०,०००/- रू हीने तिचे आजीस सोडणेकरीता सप्तश्रुंगी ज्वेलर्स बाजुचे गल्ली मध्ये महल्ले यांचे घरासमोर गाडी पार्क करून ज्वेलर्स चे दुकानात गेली व नंतर सायंकाळी ०७:१५वा दरम्यान येवुन पाहीले असता गाडी दिसुन आली नाही. अशा दिलेल्या फिर्यादीवरून पो.ठाणे राणाप्रतापनगर येथे १०८/२०२४ कलम ३७९ भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोउपनि.संतोष राठोड, पोलिस ठाणे राणाप्रतापनगर नागपुर (दि.१२मार्च) रोजी पो.ठाणे हद्दीत सोबत स्टाफ पोहवा. दिनेश भोगे, पोशि. अंकुश कनोजिया, पोशि. डिक्रुज सह पेट्रो मोबाईलने पो. ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अवैध धंदे चेक करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना मोखारे कॉलेज जवळ, खामला आउटर रिंगरोड ने जात असतांना एक संशईत ईसम मोपेड गाडीवर पोलिसांना पाहुन पळु लागला त्यामुळे पोलिसांना त्याचेवर  संशय येऊन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली ॲक्टीवा गाडी क्र.MH-31-FH-6772 जप्त करण्यात आली असुन सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान अटक आरोपी कडुन कबुली निवेदन घेऊन मेमोरंडम पंचनामा कारवाई दरम्यान वर नमुद मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो.ठाणे प्रतापनगर तसेच नागपुर शहर हद्दीतील वर नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.

तसेच पोलिस ठाणे प्रतापनगर येथे  दाखल अप.कं.११८/२४ कलम ३९५,३९७ भादवि. सहकलम ३७(१), १६५ मपोका मध्ये यातील नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मिळुन फिर्यादीस रात्रीच्या वेळी रोडवर अडवुन त्यास घातुचे पाईपने मारहाण करून त्याचा मोबाईल बळजबरी हिसकावुन घेवुन दरोडयाचा गुन्हा करुन पळुन गेले होते. यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत अशी की रोडने रात्री एकटे जाणारे येणारे लोकांना एकटे गाठून त्यांना मारहान करुन त्यांचे कडून किंमती वस्तू घेऊन जबरी चोरी करतात व पळून जातात. पोलिस ठाणे प्रतापनगर यांचे पथकाने या टोळीचा सखोल तपास केल्यामुळे वाहन चोरीचे गुन्हयाचे तपासामध्ये दरोडा, जबरी चोरी ई. गुन्हे केल्याचे नमुद आरोपीतांनी कबूल केल्याने त्यांचे कडून वरील प्रमाणे गुन्हयात गेलेला माल जप्त करण्यात आला आहे. तसेच याच आरोपीतांनी (दि.०६मार्च) रोजी रात्रीचे वेळेस पो.ठाणे बजाजनगर हद्यीमध्ये उत्तर दक्षिण हॉटेल समोर एका व्यक्तीस चाकुचा धाक दाखवून त्याचेकडील दोन मोबाईल हिसकावुन घेऊन जबरी चोरी केलेली होती.

अशा प्रकारे नागपुर शहर हद्दीमध्ये विविध ठिकाणी चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या टोळीला त्यांचा नियमित पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले असून त्यांचेकडुन विविध गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात अलेला आहे. त्यामुळे जबरी चोरी, वाहन चोरीचे अधीक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील दोन आरोपी पोलिस ठाणे प्रतापनगर यांचे पथकाने वाहन चोरीचे गुन्हयामध्ये निष्पन्न केले होते तर युनीट २ चे पथकाने ६ आरोपी वाहन चोरीचे गुन्हयासंबंधाने निष्पन्न केले होते.

प्रतापनगर पोलिसांनी सदर आरोपीतांकडे तपास करुन वाहन चोरीचे तपासामध्ये आता पावेतो या टोळीकडून एकूण ०५ दुचाकी वाहने, ०७ मोबाईल फोन, हस्तगत करुन प्रतापनगर पोलिसांचे तपासामध्ये नमुद आरोपीतांनी ०१ दरोडा, ०१ जबरी चोरी, ०५ वाहन चोरी व ०२ घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच गुन्हे शाखा युनीट २ यांनी वरील पैकी ०६ आरोपी वाहन चोरीचे गुन्हयात पकडून त्यांचे कडून ०६ दुचाकी वाहने जप्त केरुन प्रतापनगर पोलिसांचे ताब्यात दिले होते. अशा प्रकारे सदरचे दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी करणारे टोळीकडून आता पावेतो एकूण ०१ दरोडा, ०१ जबरी चोरी, ११ वाहन चोरी, ०२ घरफोडी असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त, दक्षिण विभाग शिवाजीराव राठोड यांचे निर्देशानुसार,पोलिस उपायुक्त परी १ अनुराग जैन,सहा पोलिस आयुक्त सतिशकुमार गुरव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत, पोलिस निरीक्षक गुन्हे हरीशकुमार बोराडे,  पो.ठा. राणाप्रतापनगर नागपुर शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. संतोष राठोड,सतिश भोले, पोहवा. दिनेश भोगे, एकनाथ पाटील, नापोशि विशेषकुमार,पोशि अंकुश कनोजिया, अलेकझांडर डिक्रुज, मपोहवा. निलीमा सर्व नेमणुक पो.स्टे. राणा प्रतापनगर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.