Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन केली जणावरांची सुटका…

10

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे तेलंगना येथील टोळीस विरुळ पोलिसांचे ताब्यात….

विरुळ(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा. निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिस स्टेशन विरुळ चे पथक दि. १४/०३/२०२४ रोजी पोलिस पथकासह खाजगी वाहणाने लक्कडकोट बिटमध्ये पेट्रोलींग करीत असताना मुखबिर कडुन खबर मिळाली की, राजुरा कडुन लक्कडकोट मार्गे हैद्राबाद (तेलंगाना) येथे एका तेलंगाना पासिंग च्या कंटेनरमध्ये जनावराची वाहतुक होत आहे

अशा माहीती वरुन पोलिस पथकाने आर.टी. ओ. नाका, लक्कडकोट येथे  नाकाबंदी केली असता रात्रो ११.२० वा. चे दरम्यान आर.टी. ओ. नाका येथे खबरेप्रमाणे एक कंटेनर येताना दिसला तेव्हा कंटेनरला हात दाखवुन थांबविले असता
कंटेनरच्या चालकाने कंटेनर रोडच्या बाजुला थांबवीले. सदर कंटेनर हे भारत बेन्ज कंपनीचे क्र. TS 12 UD 5321 असे होते. सदर वाहनातील इसमांना नावे विचारली असता, चालक नामे सैय्यद फारुख सैय्यद युसुफ वय ३८ वर्ष रा. महमुद नगर, किशनबाग, बहादुरपुरा हैद्राबाद (तेलंगाना) तसेच १) शेख जलील मोहमद शेख वय ३८ वर्ष रा. इलीयासनगर ता. नानुर जि. अदिलाबाद (तेलंगाना) २) कबिर जैनुद्दीन शेख वय २५ वर्ष रा. गुडसेला ता. जिवती जि. चंद्रपुर असे सांगितले. सदर वाहनामध्ये काय आहे याबाबत चालकास व इतर दोन इसमांना विचारपुस केली असता तिघेही उडवा – उडवीचे उत्तरे देत असल्याने पथकाने सदर कंटेनरची  पाहाणी केली असता सदर वाहणामध्ये दाटीवाटीने हालचाल करता येणार नाही व चारापाण्याची व्यवस्था न करता बैल जातीचे २५ नग जिवंत जनावरे मिळुन आले. सदर जनावरे कोणाचे आहे व कुठे घेवुन जात आहे अशी विचारणा केली असता सदरचे जनावरे हे गडचांदूर येथील अज्जु कुरेशी यांची असल्याची व हैद्राबाद येथे कत्तलखाण्यात घेवुन जात असल्याचे सांगितल्याने त्यांचे ताब्यातुन पांढऱ्या रंगाचे १७ नग जिवंत बैल व लाल रंगाचे ८ नग जिवंत बैल असे एकुण २५ नग जिवंत बैल प्रतेकी किं. २५,०००/- रु प्रमाणे ६,२५,००० /- रु व भारत बेन्ज कंपनीचा कंटेनर क. TS 12 UD 5321 अंदाजे किं.२१,००,०००/–रु असा एकुण २७,२५,००० /- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यात घेवुन पोस्टेला येवुन वरील नमुद आरोपी विरुध्द अप क्र. ७७/२४ महा प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ चे कलम ५ ब, ९, ११, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम – १९६० चे कलम ११(१) (क), मोटरवाहन अधिनियम-१९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद आरोपींना अटक करण्यात आली

सदर कामगिरी ही पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षकरिना जनबंधु,उपविभागिय पोलिस अधिकारी,राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्टेशन,विरुळ सपोनि. संतोष वाकडे, पोहवा. सुभाष कुळमेथे, नापोशि . विजय मुंडे, पोशि राहुल वैद्य, प्रमोद मिलमिले,सचिन थेरे,अतुल शहारे,गजानन चारोळे,  रामदास निलेवार,प्रविन जुनघरे, चापोशि काकासाहेब, सर्व पोलीस स्टेशन, विरुर यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.