Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘सॅमसंग’ ने केली वॉशिंग मशिन्‍सची नवीन रेंज लाँच ; ‘एआय इकोबबल’ फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड देणार ॲडव्हान्स फीचर

6

‘एआय इकोबबल’ हे अद्ययावत वॉशिंग मशीन सॅमसंगच्‍या ‘क्‍यू-बबल’ आणि ‘क्विकड्राइव्‍ह’ टेक्निकचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, यामुळे हे कपडे धुण्‍यासाठी कमी वेळ लागण्‍याची गॅरंटी देतात. क्‍यू-बबल तंत्रज्ञानामध्‍ये जलदपणे डिटर्जंट सामावून जाण्‍यासाठी अधिक प्रमाणात बबल्‍स निर्माण करण्‍याकरिता अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन समाविष्‍ट आहे. ‘क्विकड्राइव्‍हTM’ वॉश टाइम जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी करते. यामुळे पाणी व वीजेचीही मोठ्या प्रमाणात बचत होते.

वॉशिंग वेळेच्या बचतीसाठी ‘क्विकड्राइव्‍ह’

या मशीनचे महत्वाचे फीचर म्‍हणजे ‘क्विकड्राइव्‍ह’, जे वॉशिंगचा वेळ जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी करू शकते. ‘क्‍यू-बबल’ तंत्रज्ञानामध्‍ये अधिक प्रमाणात शक्तिशाली बबल्‍स तयार करण्‍यासाठी अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन आहे. यामुळे डि‍टर्जंट जलदपणे कपड्यांमध्‍ये सामावून जाते आणि कपडे जलदपणे व सौम्‍यपणे धुतले जातात.

कपडयांचे संरक्षण

नवीन मॉडेलमध्‍ये ‘एआय इकोबबल’ हे अत्‍यंत कार्यक्षम व इको-फ्रेण्‍डली तंत्रज्ञान आहे, जे डिटर्जंटला बबल्‍समध्‍ये बदलते. यामुळे कमी तापमानामध्‍ये देखील कपड्यांवरील धूळ जलदपणे निघून जाते आणि जवळपास ७० टक्‍के वीजेची बचत होते. तसेच सर्वोत्तम फॅब्रिक केअरची खात्री मिळते.’ एआय इकोबबल’ विविध कपडे व त्‍यांच्‍या गुणधर्मांना ओळखते आणि अनेक डेटा पॅटर्न्‍समधून योग्‍य वॉश सायकल ऑप्टिमाइज करते. यामुळे फॅब्रिक सेन्सिंगसह कपड्यांचे संरक्षण होण्‍यास मदत होते. एआय वॉश फीचर कपड्यांचे वजन ओळखते आणि लोडनुसार वॉश सायकल निर्धारित करते. तसेच ते कपड्याचा सॉफ्टनेस ओळखत कपड्यांच्‍या संरक्षणासाठी वॉश व स्पिन वेळ ऍडजस्ट करते. यामधील ‘एआय ड्राइंग’ फीचर गरजेप्रमाणे योग्य ड्राइंग सायकलची निवड करते.

विजेची बचत

डिजिटल इन्‍व्‍हर्टर टेक्‍नॉलॉजी वॉशिंग मशिन्‍सच्‍या अधिक शक्तिशाली परफॉर्मन्‍ससाठी प्रबळ चुंबकांचा वापर करते, ज्‍यामुळे वीजेचा कमी वापर होतो.

सोपी सफाई

युजर्सना डिटर्जंट ड्रॉवरमध्‍ये राहिलेले चिकट कण साफ करण्‍याचा त्रास होत नाही. ‘स्‍टे क्‍लीन ड्रॉव’र त्‍याच्‍या विशेषरित्‍या डिझाइन केलेल्‍या वॉटर फ्लशिंग सिस्‍टममधील पाण्‍याच्‍या शक्तिशाली जेट्सच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक डिटर्जंट साफ होण्‍याची खात्री देते.

सहजपणे देखरेख ठेवता येते

वॉशर व ड्रायर एआय कंट्रोल आणि वाय-फाय कनेक्‍टेड असल्‍यास ऑटो सायकल लिंक उपलब्‍ध होते. ही रेंज अनेक फीचर्ससह येते, जसे हॅबिट लर्निंग आणि इन्‍फॉर्मेटिव्‍ह डिस्‍प्‍ले, जे ग्राहकांना वापरण्‍याच्‍या सिस्टमचे रिमाइंडर देतात, सायकल्‍सबाबत सल्‍ला देतात आणि वेळेवर माहिती दाखवतात. सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अतिरिक्‍त वॉश प्रोग्राम्‍ससह सायकल्‍स, प्‍लानिंग व समस्‍येबाबत सल्‍ला देते. ते आपोआपपणे कपडे सुकण्‍याच्‍या टायमिंगला सुद्धा निवडतात.

किंमत व उपलब्‍धता

नवीन श्रेणी 7 मार्च 2024 पासून 67, 990 रूपये ते 71,990 रूपयांपर्यंतच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल.
निवडक मॉडेल्‍स सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप ॲप , रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्‍ध असतील.

वॉरंटी व ऑफर्स

डिजिटल इन्‍वर्टर टेक्‍नॉलॉजीसह सुसज्‍ज नवीन मॉडेल्‍स 20 वर्षांच्‍या वॉरंटीसह येतात.

अधिक स्‍पेससाठी स्‍पेसमॅक्‍स डिझाइन

600 x850 x 600 मिमी आकार असलेली नवीन ११-किग्रॅ वॉशिंग मशिन कोणत्‍याही जागेमध्‍ये सहजपणे मावू शकते, ज्‍यामुळे लिव्हिंग स्‍पेसेस ऑप्टिमाइज करू पाहणाऱ्या आजच्‍या ग्राहकांसाठी ही वॉशिंग मशिन योग्‍य पर्याय आहे. यामधील स्‍पेसमॅक्‍स डिझाइन आतील बाजूस अधिक स्‍पेस निर्माण करते,ज्‍यामुळे मोठ्या आकाराच्‍या लाँड्री वस्‍तूंचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.