Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिवसा घरफोडी करणार सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक, एकुण 8,35,000/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत…….
सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,दिनांक 10/03/2023 रोजी दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घराचे कुलुप तोडुन कडी कोयंडा उचकटुन अज्ञात चोराने घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 8,35,000/- रुपये किंमतीचे ऐवज चोरी गेले होते. सदर बाबत तक्रारदार याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 154/2023 भादवि क 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनस्थळी भेट देवुन घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघड करणेबाबत पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आदेशीत केले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे, पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरीत उघडकीस आणने करीता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक राजु डांगे यांचेकडे देण्यात आला होते. पोलिस उपनिरीक्षक राजु डांगे यांनी तपासा दरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी करणारे अटक आरोपीचे अभीलेख पडताळणी केली असता, गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हा लातुर येथील गुन्हे अभीलेखावरील आरोपीने केले आहे. सदर बातमीवरुन नमुद आरोपी दिनांक 12/03/2024 रोजी अटक करण्यात आली. मा. न्यायालय यांनी सदर आरोपीस 16/03/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली होती.
सदर अटकेत असलेला आरोपीत याचेकडे सखोल तपास करता त्याने सोलापुर तालुका पोलिस ठाणे गुरनं 154/2023 भादवि क. 380 454, 34 हा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केल्याची कबुली दिली. आरोपी याचेकडुन गुन्हेयातील गेलेले एकुण 8,35,000/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनिरीक्षक आर.एल डांगे, स्थानिक गुन्हे शाखा हे करीत असुन आरोपी सध्या न्यायालयील कोठडीत आहे.
नमुद आरोपी याचे गुन्हे अभीलेख पाहता त्याचेवर पिंपरी चिंचवड, लातुर, कर्नाटक मध्ये बिदर, हुमनाबाद येथे घर फोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक, प्रितम यावलकर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, सपोनि सत्यजीत आवटे व पोलीस उप- निरीक्षक सुरज निंबाळकर, पोउपनि राजु डांगे यांचे पथकातील ग्रेडपोउपनि राजेश गायकवाड, सफौ महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, , पोहवा परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोशि समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, नाचापोशि समीर शेख, चापोशि सतीश कापरे यांनी बाजवली आहे.