Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बनावट कागदपत्रांचे आधारे लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात….

7

बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता खरेदी विक्री करणा-या  टोळीला गुन्हे शाखा युनिट 1 अमरावती शहर यांनी घेतले अटक….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे काजी सयद हिसामउददीन तोसिफ वय 58 वर्ष रा चपराशी पूरा अमरावती यानी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली कि त्यांचे सासरे नामे मो. इकबाल भूरे खान यांचे नावे मासोद येथे 10 एकर शेती असून ते सन 2019 मध्ये मयत झाले आहे. फिर्यादींना दिनांक 15/03/2024 रोजी दुयम सह निबंधक
कार्यालय, तहसिल अमरावती येथून माहीती प्राप्त झाली कि, त्यांचे सांस-याचे नामे असलेल्या शेती खरेदी विक्रीचा व्यवहार होत आहे. त्यावेळी त्यांनी माहीती जाणून घेतली असता आरोपी यांनी संगनमताने कट रचून त्याचे सासरे मयत असून सुद्धा त्यांचे नावावर दुसरा इसम उभा करून तसेच त्यांचे खोटे कागदपत्रे बनून त्याचे शेताची खरेदी लावणार होते. सदर माहीती फिर्यादी यानी पोलिसाना दिली त्यामूळे पोलिसानी तात्काळ विलंब न करता आरोपीचा शोध सुरू केला तसेच फिर्यादीनी घटनेची तकार पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे दिली असता पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर अपराध क्रमांक 108 / 2024 कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (ब) भा.द.वि. चा गुन्हा आरोपीतावर दाखल झाला होता
सदर गुन्हाचे अनुषगाने गुन्हे शाखा युनीट 1 याचे कडून गुन्ह्यांत सहभाग असलेले खालील आरोपी याना अटक करण्यात आलेले आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे.
1) शेर खान हिंम्मत खान, रा. साजनपुरी खामगाव जि. बुलडाणा ह.मु. बाळापुर जि. अकोला,
2) विजयसिंग जानकीराम बलोदे, रा. बलोदे ले आउट, अकोला
3) कैलास जानकीराम बलोदे, रा. बलोदे ले आउट, अकोला
4) सुनिल मधुकर मोरवाल रा. बलोदे ले आउट अकोला,
5) अन्सार खान इब्राहीम खान, रा. मस्तान चौक खामगाव जि. बुलडाणा,
6) कल्पेश उर्फ निक्की रमेश बोहरा, रा. खामगांव जि. बुलडाणा,
7) रमेश महादेवराव थुकीकर रा. कृषीनगर अकोला,
8) कृष्णा सुनील मलीये, रा. गुलजारपुरा, जुने शहर, अकोला,
9) अतुल संजय अंकुरकार, रा. न्यू तापडीया नगर अकोला,
10) सैय्यद जफर सैय्यद नासीर, रा. वडाळी, अमरावती,
सदर गुन्हयासारखेच यापूर्वी सुद्धा अशा बनावट दस्ताऐवज बनूवन लोंकाचे प्लॉट व शेती खरेदी विक्री केल्याची दाट शक्यता असल्याने त्या दृष्टीने गुन्हे शाखा युनीट 1 गुन्हाचा तपास करीत आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपायुक्त (मुख्या),  कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त परि-2, गणेश शिंदे , सहायक पोलिस आयुक्त (राजापेठ) विभाग  जयदत्त
भवंर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजीराव बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा बाहेनकर, फिरोज खान,सतीष देशमूख, विनोद इंगळे, संतोश नागे, अमोल पाटील, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे,पोशि  सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बहादरपूरे, भूषनपदमने, रोशन माहूरे, किशोर खेंगरे यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.