Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पुण्यात साधेपणाने आणि शिस्तबद्धपणे गणेशोत्सव साजरा.
- पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जारी केले निवेदन.
- सहकार्यासाठी पुणेकरांचे मनापासून मानले आभार.
वाचा: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश
‘पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र, यंदाही करोनामुळे उत्सवामध्ये रंगत कमी आली. बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी होती. अशाही परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी कुरबूर न करता शिस्तबद्धपणे आणि वेळेत पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव पार पाडला. त्यामुळे सोहळ्यात सुरक्षा योजनेच्या नियोजनासाठी पोलिसांवरही कसलाही ताण आला नाही. म्हणूनच मी आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो’, असे पोलीस आयुक्तांनी निवेदनात नमूद केले आहे.
वाचा: किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध; ‘त्या’ नोटीसवरून उठलं मोठं वादळ
‘दरवर्षी विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला डोलायला लावणाऱ्या डीजेंपर्यंत सर्वकाही मिरवणुकांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर मिरवणुका अनुभवण्यासाठी देशभरातून लोक पुणे शहरात येतात. त्यामुळे शहरातील मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीने फुलून गेलेला असतो. यंदा मात्र, करोना संकटामुळे गतवर्षी प्रमाणेच वातावरण होते. राज्य शासनासह महापालिका आणि पुणे पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. बाप्पांची विसर्जन मिरवणूक नसल्यामुळे सारे कसे साधेपणाने, शिस्तबद्धपणे आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच झाले. त्यामुळे पुढल्या वर्षी गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने, पण अशाच शिस्तीने, इकोफ्रेन्डली पद्धतीने साजरा होऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, असे अमिताभ गुप्ता यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे.
वाचा: बाळ बोठेविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या