Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुर्व वैमनस्यातुन ईंदापुर येथे झालेल्या निर्घुन खुन प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी २ दिवसात केला उलगडा…

7

इंदापूर शहरालगतचे बायपास रोडवरील जगदंबा हॉटेल मध्ये झालेल्या खुनाचे गुन्हयाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा ,पुर्ववैमन्यसातून झाला खून ४ आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांची कारवाई…..

पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूर कडे जाणारे लेनलगतचे हॉटेल जगदंब येथे दि. १६/०३/२०२४ रोजी संध्या. ०८/०० वा चे सुमारास इसम नामे अविनाश बाळु धनवे वय ३१ वर्षे, रा. चन्होली बुरा, वडमुखवाडी,ता. हवेली जि. पुणे हा त्याचे इतर तीन मित्र नामे बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांचे सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांचे टोळीने हातात पिस्टल, कोयता घेवून  हॉटेल मध्ये बसलेल्या अविनाश धनवे याचेवर पिस्टल मधून फायर केला व
कोयत्याने त्याचेवर वार करून त्याचा जागीच खून केला. त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले.
घडलेल्या घटनेबाबत अविनाश धनवे याची पत्नी सौ. पुजा अविनाश धनवे रा. सदर हिने इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं.२७३/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, १०९ भारतीय शस्त्र अधि. कलम ३, २५, २७ म.पो.का.क. ३७(१), १३५
सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख,अपर पोलिस अधीक्षक  संजय जाधव, बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी  सुदर्शन राठोड, बारामती विभाग, स्वप्निल जाधव, दौंड विभाग यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकांसह व पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे इंदापूर पो स्टे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादी यांचेकडून प्राप्त माहिती चे आधारे सदरचा गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पुर्ववैमन्यसातून झालेला असल्याचे निष्पन्न झाले. मयत अविनाश बाळू धनवे याची च-होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गुन्हयातील आरोपी हे कोल्हापूर कडे पळून जात असल्याची गोपनीय बातमी बातमीदारामार्फत मिळाली होती, तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर आरोपी नामे

१) शिवाजी बाबुराव भेंडेकर, वय ३५ वर्षे, रा.पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे

२) मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे वय २० वर्षे, रा. आंबेडकर
चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे

३) सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४,
चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे

४) सोमनाथ विश्वंभर भत्ते, वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड,
सोळू, ता. खेड जि.पुणे

यांना पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील इतर पाहिजे आरोपींचा शोध चालू आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक  संजय जाधव, बारामती विभाग, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागिय पोलिस अधिकारी,हवेली विभाग भाऊसाहेब ढोले, स्वप्निल जाधव, दौंड विभाग,सुदर्शन राठोड, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे स्था. गु.शा. चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, पोउपनि प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, पोलिस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय घुले,प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेशसुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पो स्टे कडील सपोनि प्रकाश पवार,
पोउपनि गरड, पोलीस अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, विनोद
काळे, मपोहवा माधुरी लडकत यांनी केली आहे. आरोपींना मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.