Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ganpati Visarjan Updates: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

18

हायलाइट्स:

  • मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना.
  • वर्सोवा गाव येथे समुद्रात चार मुलं बुडाली.
  • दोन मुलांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता.

मुंबई: मुंबईतील वर्सोवा बीच येथे गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात चार मुलं बुडाली असून त्यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे तर दोन मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. बीचवर तैनात असलेले लाइफ गार्ड्स या मुलांचा शोध घेत आहेत. रात्री ९ वाजताच्या सुमारास वर्सोवा गाव येथील पाटील गल्ली नं. २ येथे समुद्रात ही दुर्घटना घडली. ( Ganpati Visarjan In Mumbai Latest News )

वाचा: मोठा दिलासा! आज बरे होणाऱ्या करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, सक्रिय रुग्णही घटले

कोविड नियमांमुळे यंदा गणेश विसर्जनासाठी अनेक नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या चौकटीत राहून गर्दी टाळत यंदा विसर्जन पार पडत आहे. आज दिवसभर मुंबईतील समुद्र किनारी विसर्जनाची लगबग पाहायला मिळाली. अत्यंत शिस्तबद्धपणे विसर्जन सुरू असतानाच वर्सोवा येथील दुर्घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा: किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध; ‘त्या’ नोटीसवरून उठलं मोठं वादळ

वर्सोवा गाव येथे समुद्रात विसर्जनादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुले बुडाली. त्यावेळी तिथे तैनात असलेल्या लाइफ गार्ड्सनी प्रसंगावधान दाखवत तातडीने शोधमोहीम सुरू करत दोन मुलांना वाचवण्यात यश मिळवले आहे तर दोन मुलांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून अद्याप शोधमोहीम सुरू आहे. या घटनेबाबत लाइफ गार्ड विजय फोका यांनी माहिती दिली असून सदर मुलांबाबत अद्याप अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

वाचा: मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप

दरम्यान, मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १ हजार ९१० सार्वजनिक तर १७ हजार ६२३ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून कृत्रिम तलावात ७१० सार्वजनिक व ७ हजार ७६१ गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. वर्सोवा येथील घटना वगळता मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना वा अनुचित प्रकार घडलेला नाही. लालबागचा राजा सह अनेक प्रमुख गणपतींचे वेळेत विसर्जन पार पाडण्यात आले आहे.

वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.