Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….

7

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्चात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा त्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला, दोन कमांडरसह वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश….

महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस….

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आलेले आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन  अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व 05 कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 04 पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. त्यांची प्राथमिक ओळख पटविली असता,

1) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय 28 वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती

2) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय 32 वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती

3) कुरसंग राजू, प्लाटून सदस्य

4) कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य

अशी नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण 36 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. यासोबतच घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 02 नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे.

सदर अभियान  विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर,संदिप पाटील  पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र. अंकित गोयल, पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ  जगदीश मीणा  पोलिस अधीक्षक  नीलोत्पल , अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश ,पोलिस उपअधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.