Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ट्रेडींगच्या नावाखाली आर्थीक फसवणुक करणारे उत्तरप्रदेशातुन घेतले ताब्यात,नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…
सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपींना नागपूर ग्रामीण सायबर पोलीसांनी केले गजाआड उत्तरप्रदेश येथुन मोठया प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल केले जप्त…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी सौ. संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११ / १२ / २०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशनद्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंगद्वारे विवीध तारखेला एकुण ११,४०,०००/- रूपये जमा करून शेयर मध्ये गुंतवणुक केली. दि. ३१ / १२ / २०२३ रोजी फिर्यादीस फायदा
झाल्याचे दिसुन येताच फिर्यादीस झालेली फायदयाची रक्कम विड्रॉल करत असता विड्रॉल झाली नाही म्हणून YHB Master Your own Destiny व्हॉट्सअप ग्रुपवर माहीती टाकली परंतु समाधान न झालेवरून फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीचे रीपोर्ट वरून पोलिस ठाणे काटोल अप. क्र. १८२ / २४ कलम ४२० भादंवि सहकलम ६६(डी) माहीती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला होता. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पथक आरोपींचा शोध घेत असता तांत्रिकरीत्या आरोपी हे उत्तरप्रदेश राज्यातील हरदोई जिल्हयातील असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त करून वरीष्ठांच्या परवानगीने पथकाने आरोपीचे राहते घरी रेड केली असता दोन्ही आरोपी नामे-
१) मोहम्मद सफीक रहीम बक्स, वय २५ वर्ष, रा. घर क. ४०६ वार्ड क.०८ गाव टंडीयावा पोलीस ठाणे टंडीयावा जि. हरदोई उ. प्र.
असे सांगुन त्याचे गावातच सिम कार्ड विक्रीचे दुकान असल्याचे सांगीतले व दुस-याने आपले नाव
२)आशिष कुमार राजाराम, वय २५ वर्ष, रा. सिकंदरपुर, पोलीस ठाणे टंडीयावा जि. हरदोई उ.प्र.
यांना कायदेशीररीत्या ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपींचे ताब्यातुन Vi कंपनिचे पॅकेट मध्ये असलेले वापरलेले एकुण १७८० नग सिम कार्ड व Jio कंपनिचे पॅकेटमध्ये वापरलेले एकुण ४१४ नग सिम कार्ड तसेच खाकी रंगाचे छोटे पॅकेट मध्ये असलेले वापरलेले एकुण ४३२
नग सिम कार्ड असे एकुण २,६२६ नग सिम कार्ड किंमत २,६२,६००/- रू, एकुण ४० नग विविध कंपनीचे साधे तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमती १,३१,०००/- रू Jio कंपनीचे डोंगल किंमती १,५००/-रू, इलेक्ट्रीक सॉकेट बोर्ड, चार्जर, विविध बॅकेचे पासबुक असा एकुण ३,९५,७०० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे, सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, पोहवा रोहन डाखोरे, पोहवा वर्षा खंडाईत, नापोशि संगिता, पोशि अमृत
किनगे, नापोशि ममता सरोदे, नापोशि सतिश राठोड, पोशि मृणाल राउत, मनिश नेवारे यांनी पार पाडली.