Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केला ATM लुटीचा व चोरीचा गुन्हा उघड….

8

मुसळगाव MIDC परिसरात सिक्युरीटी गार्डला चाकुचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून ATM फोडणारे गुन्हेगार नाशिक ग्रामीण पोलीसांचे जाळ्यात,स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी….

नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत दि. १३/०३ /२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा. लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे सिक्युरीटी गार्डला
अज्ञात ०४ आरोपींनी चाकु व कोयत्याचा धाक दाखवून, मारहान दमदाटी करून कंपनीचे ऑफिसमधील सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे डी.व्ही. आर., मॉनिटर, वस्तु लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेवून सिक्युरीटी गार्डला दोरीने बांधून कपंनीचे आवारातील पार्क केलेली कंपनीची व्हेरिटो कार जबरीने चोरून घेवुन गेले बाबत घटना घडली होती.
तसेच त्याच दिवशी पहाटे सदर चोरीचे कारमधून वरील घटनेतील आरोपींनी मुसळगाव MIDC परिसरातील सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँकेचे ATM मध्ये प्रवेश करून सिक्युरीटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून, मशिनला पट्ट्या सारखा दोर बांधून, ATM मशिन सदर कारने बाहेर ओढून सिक्युरीटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदर ATM मशिनमध्ये सुमारे १४ लाख रूपये रोख रक्कम होती. सदर दोन्ही घटनांबाबत MIDC सिन्नर पोलिस ठाणे येथे १) गुरनं ८८ / २०२४ भादवि ३९४,५११,
४२७,३४२,३४ आणि २) गुरनं ८९ / २०२४ भादवि ३९४, ४२७, ३४ प्रमाणे जबरी लुटमारीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयात आरोपींनी चोरून नेलेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेरिटो कार क्र. MH-15-EP-6567 ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत मिळून आली होती.

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य
मिरखेलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी वरील घटनांचे अनुषंगाने सविस्तर माहिती घेवून MIDC सिन्नर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हे
उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व MIDC सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांची पथके सदर गुन्हयांचा संयुक्त तपास करत होते. सदर गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हयातील साक्षीदारांनी आरोपींचे
सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थागुशाचे पोलिस अंमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती काढून, सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर, रा. शहा, ता. सिन्नर याने त्याचे साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांनी मुसळगाव परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
१) गोरख लक्ष्मण सोनवणे, वय २८, रा. मुसळगाव, ता. सिन्नर,
२) सुदर्शन शिवाजी ढोकणे, वय २८, रा. कुसमाडी, ता. येवला, ह.मु. मुसळगाव, ता. सिन्नर
सदर आरोपींना वरील गुन्हयांचे तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार नामे प्रविण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर, रा. शहा, ता. सिन्नर व एक विधीसंघर्षीतग्रस्त यांचेसह मागील आठवडयात मुसळगाव MIDC परिसरातील कंपनीतून एक फोर व्हीलर कार जबरीने चोरून ATM मशिन चोरण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेले आरोपींचे कब्जातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेला लोखंडी कोयता व मोबाईल
फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर आरोपींना पुढील तपासकामी MIDC सिन्नर पोलिस ठाणेस हजर करण्यात आले आहे. यातील मुख्य आरोपी प्रविण उर्फ भैय्या कांदळकर याचा पोलिस पथके कसोशिने शोध घेत असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य
मिरखेलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व MIDC सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोउनि किशोर पाटील, स्थागुशाचे पोलिस अंमलदार विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गरूड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले तसेच MIDC सिन्नर पो.स्टे.नापोशि भगवान शिंदे,योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाणे यांचे पथकाने वरील दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले

Leave A Reply

Your email address will not be published.