Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चोपडा शहर पोलिसांचा कुंटनखाण्यावर छापा महीलांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचे कडुन कुंटनखाना चालविणारे 11 आरोपींना अटक करुन 50 पिडीत महीलांची सुटका…..
चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त अस् की,
चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये अनधिकृत पणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवुन त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याबाबत पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना खबर मिळाली होती. त्यानुसार दिनांक 20/03/2024 रोजी 07:45 वा. चे सुमारास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला व पंचाना नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये पाठवुन तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याची खात्री करणेबाबत कळविले होते. तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असलेबाबत खात्री झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा , चोपडा शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार अशांनी सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई केली
असता एकुण 11 महीला आरोपी हे स्वतःचे फायद्यासाठी त्यांचे ताब्यातील झोपड्यामध्ये एकुण 50 महीलांना अडकवुन त्यांचा
देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचेकडुन कुटूंणखाना चालवितांना मिळुन आल्या आहेत. त्यांचेवर चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 111 / 2024 स्त्रिया व मुलीचे अनैतीक व्यापारास प्रतिबंध अधिनियम सन 1956 चे कलम
3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी
1) शर्मिला काले तमंग वय 48 वर्ष रा. नारायणवाडी ता चोपडा ह मु वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
2) उषा युवराज धोटे वय 40 वर्ष रा. वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका
पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
3) किरण हरी लांबा वय 40 वर्ष रा. होलशीमन काठमांडु नेपाळ ह मुरा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
4) मिराबाई चिंतामण चौधरी वय 45 वर्ष रा गांधलीपुरा अंमळनेर ह मु वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
5) मंगलाबाई रमेश मराठे वय 58 वर्ष रा. नगरपालीका
पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
6) नुरजहाँ बेगम अकबर शेख वय 47 वर्ष रा आसमसोल ब्रम्हचारी विद्यालय कालीपुर गेट कोलकाता ह मुरा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
7 ) आसमा बेगम अब्दुल्ला शेख वय 35 वर्ष अनंत बिल्डीग कळंबोली रोड रायगड ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
8)सुभद्रा पुम्या नायक वय 40 वर्ष रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
9) माया बाप बख्तु लांमा वय 54 वर्ष रा. सिक्कीम ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
10 ) संगीता जित बहाद्दुर थापा वय 53 वर्ष रा. नारायण वाडी चोपडा हमु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
11) सुनिता देवी फौजी मंडल वय 40 वर्ष रा. गोणगा अभय नगर कोलकाता ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता.चोपडा जि.जळगांव
यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन एकुण 50 पिडीत महीलांची सुटका करुन त्यांना आशादिप सुधारगृह जळगांव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगांव परीमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुनाल सोनवणे चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पोलिस स्टेशन, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन, सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे, सहा. पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, पोउपनि अनिल भुसारे, पोउपनि योगेश्वर हिरे, सफौ.जितेंद्र सोनवणे,पोहवा विलेश सोनवणे,दिपक विसावे, हरिषचंद्र पवार,शेषराव तोरे,संतोष पारधी,ज्ञानेश्वर जवागे,महेंद्र साळुंखे,सुभाष सपकाळ, नापोशि संदीप भोई, मपोहवा विद्या इंगळे,
शुंभागी लांडगे,रत्नमाला शिरसाठ, पोशि रविद्र दिलीप पाटील,लव सोनवणे,युनुस शहा,प्रकाश मथुरे,प्रमोद पवार,रविंद्र बोरसे,मदन
पावरा,विजय बच्छाव,मपोशि अनिता हटकर यांनी केली आहे.