Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा वाळु माफीयांना दणका,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

7

अवैध (वाळुची)रेतीची वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले,सहा. पोलिस अधिक्षक रश्मीता राव यांची धडक कारवाई….

तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी,सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांनी अवैध रेती वाहतूक विरोधात आणखी एक मोठी कार्यवाही करत धडक मोहीम हाती घेतली असून त्यामुळे रेती वाळु माफियाचे दाबे दणाणले आहेत.

गुरुवारी ता(२१) ला सहाय्यक पोलिस अधिक्षक हे पोलिस वाहनाने पोलिस स्टॉफसह पेट्रोलींग करीत असतांना मुखबिराकडुन मिळालेल्या माहीतीवरुन मौजा नवरगाव ते तामसवाडी रोडवर वाहनांची तपासनी केली असता कोणतेही परवाण्या शिवाय अवैद्यरित्या रेती वाळुची वाहतुक करतांना ७ ट्रॅक्टर मिळुन आले ते ट्रॅकटर जप्त करून आरोपी चालक

१)लिलाधर वासुदेव बनकर वय ४१ वर्षे रा. तामसवाडी

२)चालक जितेंद्र राजकुमार देवगडे वय २५ वर्षे रा. उमरवाडा चालक अनमोल युवराज बोंदरे वय २८ वर्षे रा. उमरवाडा

३)चालक नामे रवि फकीर मारबते वय ३८ वर्षे रा. उमरवाडा

४)चालक नामे संजय राजेश्वर सोनवाने वय ३७ वर्षे रा. उमरवाडा ता. तुमसर

५)चालक नामे रोहीत झामसिंग परतेती वय १८ वर्षे रा. मोहगाव खदान ता. तुमसर,

६)चालक नामे प्रकाश गोपाल कामथे वय ३८ वर्षे रा. नवरगाव ता. तुमसर तर

ट्रॅक्टर मालक आदिनाथ सुरेश सार्वे वय अंदाजे ३० वर्षे रा. सितेपार, सलाम दिलवर तुरक वय अंदाजे ५५ वर्षे रा. दत्तात्रय नगर, येरली रोड, तुमसर,

१)संदिप कुकडे वय अंदाजे ४३ वर्षे रा. तुकडा (तामसवाडी),

२)नितीन समरीत वय अंदाजे ५० वर्षे रा. मोठा बाजार, तुमसर,

३)प्रविण फटींग वय अंदाजे ४० वर्षे रा. मोठा बाजार तुमसर,

४)प्रभाकर कान्हा गुर्वे वय ४० वर्षे रा. नवरगाव या ट्रॅक्टर

चालक व मालक यांचे विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन मिळालेल्या मालात

१)ट्रॅक्टर क्र.एम एच ३६जी १०५१ व ट्रॉली

२)ट्रक्टर क्र. एम एच ३६ एल ६७०९ व ट्रॉली क्र. एम एच ३६ ए ९३०३

३)ट्रॅक्टर क्र. एम एच ३५ ए आर ६४३८ व ट्रॉली विना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली

४)ट्रॅक्टर क्र. एम एच ३५- ४७४३व ट्रॉली

५)ट्रक्टर क्र. एम एच ३६ ए जे ५३५७ व ट्रॉली

१)ट्रॅक्टर क्र. एम एच ३६ झेड ४०३२ व ट्रॉली

प्रत्येकी किंमती ५०००००/- रु. प्रमाणे ३५०००००/- रु.
प्रत्येकी ट्रॅक्टरमध्ये १ ब्रॉस किंमती ४०००/- रु. प्रमाणे एकुण ७ ब्रास रेती एकुण किंमती २८०००/- रु. चालकांचे ताब्यातील ६ नग मोबाईल एकुण किंमती २८०००/- रु. असा संपुर्ण एकुण ३५५६०००/-रु.चा माल जप्त करण्यात आला. असुन फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरुद्ध ३७९,१०९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे

सदर कारवाई पोलिस अधिक्षक लोहीत मतानी,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकोडे, तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी,सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव,पो उपनि विजय पंचबुधे यांच्या मार्गदर्शनात तपास पोउपनि निवृत्ती गिते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.