Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Boult Z40 Ultra Review: पैसा वसूल बजेट ANC इअरबड्स!

10

५ हजार रुपयांच्या आत Boult Z40 Ultra लाँच करून Boult भारतीय बाजरात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीनं जरी यांना प्रीमियम म्हटलं असलं तरी यांची किंमत खिशाला परवडणारी आहे. फक्त १,९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना प्रीमियम डिजाइन आणि अनेक फिचर देण्याचा हा कंपनीचा प्रयत्न आहे, ज्यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा देखील समावेश आहे. परंतु खरंच चांगली परफॉर्मन्स देण्यात बोल्टला यश मिळालं आहे का? चला पाहूया Boult Z40 Ultra review मध्ये.

डिजाइन आणि बिल्ड

Boult Z40 अल्ट्रा इयरबड्स ब्लॅक, बेज आणि मेटॅलिक अश्या तीन वेगवेगळ्या शेड्समध्ये येतात. तिन्ही ऑप्शनच्या बिल्ड क्वॉलिटीमध्ये प्लास्टिकचा वरप करण्यात आला आहे. बेज ऑप्शनमध्ये रबर फिनिश आहे. तर ब्लॅक व्हर्जनमध्ये रबर आणि ग्लॉसीमध्ये प्लॅस्टिकचे मिश्रण वापरण्यात आले आहे. तर मेटॅलिक व्हेरिएंटमध्ये पूर्णपणे प्लास्टिक बिल्डसह ब्रश मेटॅलिक फिनिश आहे.
हे देखील वाचा: Boult Curve Buds Pro Review: दमदार बॅटरी बॅकअप देणारे बजेट फ्रेंडली इअरबड्स

बोल्ट झेड४० प्रोच्या तुलनेत झेड४० अल्ट्राच्या केसमध्ये जास्त पारंपारिक डिझाइन आहे. केसच्या फ्रंटला LED इंडिकेटर आणि तळाशी USB Type-C पोर्ट आहे. तर इयरबड्समध्ये प्लास्टिक बिल्डसह स्टेम डिझाइन आहे. त्यात घाम किंवा हलका शिंतोड्यांपासून वाचवण्यासाठी IPX5 रेटिंग आहे.

आरामदायी आणि सुरक्षित फिट देण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे इयरटीप्स देण्यात आल्या आहेत. कितीही हालचाल करून देखील कानात इयरबाडस हलले नाहीत. त्यामुळे यांची बिल्ड क्वॉलिटी चांगली म्हणता येईल, परंतु यांच्या फील पेक्षा यांचा लूक जास्त चांगला आहे. बेज आणि ब्लॅक मॉडेल्स २ हजारांच्या बजेटमध्ये खरंच अपेक्षेपेक्षा जास्त चांगला लूक देतात.

फीचर्स

बोल्टचे लेटेस्ट ट्रू वायरलेस इयरबड्स बास वाढवण्यासाठी “बूम एक्स” टेक्नॉलॉजीसह 10 मिमी ड्रायव्हर्ससह येतात. यात SBC आणि AAC कोडेक्सचा सपोर्ट देखील आहे. Z40 Ultra मधील सर्वात उपयुक्त फिचर म्हणजे यातील ड्युअल डिव्हाइस कनेक्शन, ज्यामुळे तुम्ही Bluetooth 5.3 द्वारे दोन डिव्हाइसेसशी इयरबड कनेक्ट करू शकता आणि स्विच करू शकता.

हे इयरबड्स गुगल असिस्टंट आणि सिरीचा सपोर्ट देखील आहे, डावा इयरबड काही काळ दाबून ठेवल्यास असिस्टंट अ‍ॅक्सेस करता येतात. Z40 Ultra मध्ये मोठा टच सेन्सेटिव्ह एरिया देण्यात आला आहे ज्यामुळे प्लेबॅक कंट्रोल, व्हॉल्यूम कंट्रोल, कॉल रिसिव्ह आणि एन्ड करता येतात, तसेच मोड दरम्यान स्विच करण्यास आणि इतर अनेक कामं करता येतात.

प्रिझम व्हॉइस PLC फिचरमुळे कॉलिंगमध्ये AI पावर पाहायला मिळते, तर ‘झेन मोड’ मुळे कॉल क्लॅरिटी वाढते. या दोन्ही फीचर्समुले जबरदस्त कॉलिंग अनुभव मिळतो. परंतु वारा आणि ट्राफिकच्या आवाजात आपला अपेक्षाभंग होतो. परंतु या बजेटमध्ये येणाऱ्या बहुतांश इयरबड्समध्ये हाच ट्रेंड आहे. या बजेट फ्रेंडली इयरबड्सयामध्ये गेमिंगसाठी ‘कॉम्बॅट मोड’ आहे त्यामुळे गेमिंग दरम्यान अल्ट्रा लो लेटेन्सी मिळते.

परफॉर्मन्स

Boult Z40 Ultra मध्ये Sonic Core Dynamics आणि 10mm ड्रायव्हर्सच्या मदतीनं क्वॉलिटी ऑडिओ मिळतो. झेड४० मध्ये जबरदस्त बास देण्यात आला आहे. चित्रपट पाहताना बास जास्त असलेल्या ऑडिओची चांगली झलक मिळते. शिवाय, यात बास पंप-अप करण्यासाठी बास बूस्टेड मोड आणि इन्स्ट्रुमेंट वेगळे करण्यासाठी ‘रॉक’ मोड आहे. यांचा आवाज मात्र तसा कमी आहे, म्युजिक ऐकताना ही समस्या येत नाही परंतु ऑडिओबुक आणि पॉडकास्ट ऐकताना आवाज कमी वाटतो. कधी कधी बास खूप जास्त वाटतो परंतु त्याचा अतिरेक होत नाही, त्यातून काही डिटेल्स ऐकता येतात. ज्यांना खूप जास्त बास आवडतो त्यांना Boult Z40 Ultra नक्की आवडतील.

Boult Z40 Ultra मध्ये ३२ डेसिबल पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे इयरबड्स फॅन, मिक्सर आणि आजूबाजूला होणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा आवाज सहज करू शकतात. तर ट्राफिकमध्ये यांची जादू जास्त दिसून येते. या इयरबड्समध्ये ट्रान्स्परन्सी मोड देण्यात आला आहे. जो किंमतीला अनुसरून चांगली परफॉर्मन्स देतो, कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी देखिली करतो.

बॅटरी

Boult Z40 Ultra इयरबड्समध्ये एकूण 100 तासांपर्यंतचा प्लेबॅक देतात, जी नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. किंमत कमी असूनही, Z40 Ultra मध्ये USB Type-C पोर्टच्या मदतीनं फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो, तसेच 10 मिनिटांच्या चार्जवर 100 मिनिटे प्लेबॅक देखील मिळतो. Z40 अल्ट्रा इयरबड्सची बॅटरी सरासरीपेक्षा जास्त टिकते. माझ्या रेग्युलर युजमध्ये मी आठवडाभर हे चार्जच केले नाहीत हे विशेष.

निष्कर्ष

१,९९९ रुपयांमध्ये Boult Z40 Ultra इयरबड्स अनेक फिचर, अ‍ॅव्हरेज साउंड क्वॉलिटी, जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि मजबूत बिल्ड क्वॉलिटी देतात. यात दमदार बास मिळतो तर एकंदरीत ऑडिओ क्वॉलिटी या बजेटमधील इयरबड्स पेक्षा चांगलीच म्हणता येईल. तसेच यात डिसेंट अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळते. बिल्ड क्वॉलिटी देखील एक प्रीमियम अनुभव देते. तसेच टच कंट्रोल्स चांगले आहेत परंतु कस्टमायजेबल असते तर मजा आली असती.

Boult Z40 Ultra विकत घ्यावे का? तर हो, फक्त २ हजरांच्या बजेटमध्ये हे एक प्रियमियम अनुभव देतात त्यामुळे तुम्ही नक्कीच यांचा विचार करू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.