Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बुटीबोरी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,३ मोटारसायकल केल्या हस्तगत…
मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटी बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,वेगवेगळ्या गुन्ह्यातील ३ मोटारसायकल केल्या जप्त….
बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
फिर्यादी नामे आकाश अशोक सवईकार, वय २९ वर्ष रा. मंगलधाम कॉलनी वृषभ विहार प्लाट नं २४ तह.जिल्हा अमरावती अंकीता हाईटस ५०४ सातगाव तह. हिंगणा जि. नागपुर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बुटीबोरी येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिला की,त्यांची होन्डा कंपनिची शाईन मो.सा. क्र. एम.एच. २७ ए.झेड. ५२९७ किंमती ४०,०००/- रू. ची कुणीतरी अज्ञात चोराने दि. १७/०३/२०२४ चे ००.३० वा. ते ११.०० वा. दरम्यान अंकिता हाईटस अपार्टमेंट ची खालील पार्कींग मधुन चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून चोरीचा गुन्हा नोंद
करुन तपास सुरु होता
सदर गुन्हयाचे तपासामध्ये अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचे तपासकामी विशेष पथक गठीत करून अनोळखी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. संबंधीत पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय मुखबिर पेरून गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असतांना मुखबीर द्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून मौजा बोरखेडी फाटक शिवार ओव्हरब्रिजचे खाली झोपुन असलेला आरोपी नामे पप्पु उर्फ ख्वाजा
राशिद शेख, रा. महगाव कस्बा वार्ड नं. ४ मेहबुब पठाण यांच्या घरी ता. दारव्हा जि. यवतमाळ यास गुन्हया संबंधाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून वरील नमुद आरोपीस सदरसगुन्हयात अटक करण्यात आली सदर आरोपी हा अट्टल मोटरसायकल चोर असल्याने त्याचा मा. न्यायालयाकडुन ३ दिवस पोलिस कोठडी घेऊन पोलिस कोठडी दरम्यान सदर आरोपीने या गुन्हयाव्यतिरीक्त पोस्टे बुट्टीबोरी व पोस्टे एम आय डी सी बुट्टीबोरी येथे नोंद असलेल्या गुन्हयातील मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडुन अशा एकूण ०३ मोसा किंमती ८२,००० /- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे बुट्टीबोरी येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव नेमलेल्या विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे, पोहवा आशिष टेकाम, युनूस खान, कृणाल पारधी, पोशि दशरथ घुगरे, आशिष कछवाह व माधव गुट्टे यांनी पार पाडली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा कृणाल पारधी पोस्टे बुट्टीबोरी हे करीत आहे.