Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उच्चशिक्षीत तरुणीचे अपहरण करुन खंडनी मागणार्याचा डाव राणा प्रतापनगर पोलिसांनी उधळला,अपह्रुत तरुनीसह दोन अपहरणकर्ते ४८ तासाचे आत पोलिसांचे ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(२०) रोजी रात्री डयुटी संपल्यानंतर हिंगणा टी पॉईन्ट येथे असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये कॅम्पुटर इंजिनीअर म्हणुन काम करणारी तरुणी तिच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीवरुन घरी येण्यास निघाली असता उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचे वडीलांनी राणाप्रतापनगर पोलिस ठाणे येथे मुलगी हरविल्याबाबतची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी मिसिंग रजि क्र २०/२०२४ दि(२१)रोजी दाखल करण्यात आली होती,सदर मिसिंगचे तपासादरम्यान अज्ञात इसमाने मिसिंग तरुणीच्या मोबाईवरुन दि २१.०३.२०२४ रोजी दुपारचे सुमारास तिचे घरी कॉल करुन भोजपुरी / हिंदी भाषेमध्ये, तुमची मुलगी माझे ताब्यात आहे, जिवंत पाहीजे असल्यास ३० लाख रुपये तयार ठेवा, पैसे कोठे घेऊन यायचे ते शनिवार पर्यंत सांगतो असा फोन आला असल्याचे तरुणीच्या वडीलांनी पोलिसांना कळविल्यानंतर, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरची माहीती वरीष्ठांना कळवुन, वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व
पोलिस उपायुक्त, परीमंडळ १ अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलिस पथके नेमुण अपहरण झालेल्या तरुणीचे शोधकार्य सुरू केले. दरम्यान अपहरीत झालेल्या मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरुन राणाप्रतापनगर पोलिस ठाणे येथे अप क्र
१३५/२०२४ भादवि कलम ३६४- अ, ३९२, ३४ सहवाचन कलम
३, २५ भाहका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता
नमूद गुन्हयामध्ये सदर अपह्रुत तरुणी ही कॅम्पुटर इंजिनीअर असलेल्या तरुणीचे खंडणीसाठी अपहरण झाले असल्याने गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याचे तपास पथक व क्राईम युनिट ०१, नागपूर शहर तपास पथक यांनी घटनास्थळवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलचे तांत्रिक निरीक्षण व इतर मुद्देनिहाय एकत्रित तपास जलदगतीने चालु केला.तसेच अपहरण झालेला तरुणीचा मोबाईल तिचे लॅपटॉपला लिंक असल्याने लॅपटॉप मध्ये पिडीत तरुणीची गुगल लोकेशन हिस्ट्री चेक केली असता तिचे शेवटचे लोकेशन हिंगणा एमआयडीसी परीसरात दिसुन आल्याने त्या दृष्टीने सदर परीसरात लक्ष केंद्रीत करुन तपास चालू ठेवला.
या दरम्यान दि २२.०३.२०२४ रोजी सायंकाळचे सुमारास अपहरण झालेल्या तरुणीने अनोळखी मोबाईल क्रंमाकावरुन तिच्या वडीलांना कॉल करुन मला एका ठिकाणी बांधुन ठेवलेले आहे, मला हे ठिकाण कोठे आहे हे माहीत नाही परंतु माझी सुटका करा असे सांगितले असता पोलिसांनी सदरच्या मोबाईल क्रमाकाचे लोकेशन तात्काळ प्राप्त करुन नमूद ठिकाणी जाऊन पडताळणी केली असता सदरचे ठिकाण हे एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतील महाजनवाडी या गावातील चाळीतील रुममध्ये असलेने दिसुन आले. या ठिकाणी अपहरण झालेली तरुणी एका रुम मध्ये मिळुन आली. तसेच तिचे अपरहण करणारी तरुणी [आरोपी] मिळुन आली. यातील महीला आरोपी हीचेकडे कसून चौकशी केली असता तिने व तिच्या प्रियकराने संगणमताने करुन नमूद तरुणीचे
अपहरण केले असलेचे सांगितल्याने तिच्या प्रियकराची माहीती घेऊन दोन्ही पथकांनी यातील पाहीजे आरोपी यास शिताफीने
पकडले. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे स्वप्नील दिलीप मरसकोल्हे वय २५ वर्ष, २] कु. चेतना विजय बुरडे वय २३
भंडारा जिल्हयातील रहीवासी असल्याचे निष्पन्न झाले . दोघांचे मुळ गाव एकच असुन ते सध्या नागपूर येथे मागील दोन वर्षापासुन किरायाने रुम करुन एकत्रितपणे नोकरीच्या शोधार्थ राहत आहेत.गुन्हयाचा सखोल तपास आरोपी यांचेकडे केला असता त्यांना पैश्याची चणचण असल्याने त्यांनी सदरचा प्रकार केल्याचे
कबुल केले. सदरच्या गुन्हयाचा कट तसेच पूर्वतयारी कश्या प्रकारे करण्यात आलेली होती याविषयी सविस्तर तपास केला असता यातील आरोपी यांनी क्राईम संबधीत वेबसिरीज पाहुन अंगकाठीने किरकोळ व प्रतिकार करण्याची क्षमता कमी असणार्या मुली हेरण्याचे काम चालू केले यातील अपह्रुत मुलगी हीस अडवुन तीला पिस्तुल व एक एनआयए चे नोटीस दाखवुन यातील अपह्रुत तरुणीस आम्ही एनआयए चे अधिकारी असुन तुम्हाला आमचेबरोबर चौकशीकामी यावे लागेल असे धमकावुन गाडीसह घेऊन गेले. पुरुष आरोपी हा यातील अपह्रुत मुलीच्या फोनवरुन वेगवेगळया ठिकाणी जाऊन थोडया वेळासाठी मोबाईल चालु
करत असे, जेणेकरुन तपास यंत्रणा यांची दिशाभुल होईल. तसेच त्याची बोलीभाषा ही मराठी असताना तो दिशाभुल करण्यासाठी भोजपुरी / हिंदी भाषेमध्ये बोलत होता, त्याचेकडे या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुगल ट्रान्सलेटरचा वापर करुन हिंदी वरुन भोजपूरी वाक्ये तयार करुन बोलला होता तसेच त्याने स्व:ताच्या व अपह्रुत तरुणीच्या दुचाकी गाडयांच्या नंबर प्लेट्स सुध्दा बदललेल्या आहेत. ज्यावेळेस आरोपी यांनी अपह्रुत तरुणी हीला बंदीस्त करुन ठेवले होते, त्या दरम्यान आरोपी यांने अपह्रुत तरुणी हीने परीधान केलेले ६२५००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने जबदस्तीने काढुन घेतले होते. नमूद दागिने, आरोपींनी गुन्हयात वापरलेले मोबाईल, अपह्रुत तरुणीचा मोबाईल, दोन दुचाकी वाहने व एटीएम कार्ड असा एकुण २,०२,५००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे गुन्हयास भादवि कलम ३९२,३४ सहवाचन कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे वाढविण्यात आलेले आहे.नमूद आरोपी यांना गुन्हयाचे तपासकामी मा. न्यायालय यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण आरोपी यांना तपासकामी दि २७.०३.२०२४रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, नागपूर शहर रविंद्र कुमार सिंघल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग डॉ. शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त [ गुन्हे ]
निमित गोयल,पोलिस उपायुक्त, परीमंडळ क्र ०१ अनुराग जैन, सहा. पोलिस आयुक्त, [गुन्हे ].डॉ. अभिजीत पाटील व सहा.पोलिस आयुक्त, सोनेगाव विभाग, हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली राणाप्रतापनगर पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रंजीत सांवत, पोलिस निरीक्षक [ गुन्हे ], हरीषकुमार बोराडे, सपोनि हेमंत चौधरी, सपोनि अतुल कदम, पोउपनि संतोष राठोड,पोहवा दिनेश भोगे,मपोहवा निलीमा बोरकर,पोशि अंकुश कनोजीया,अॅलेक्स डिक्रुज,बिजय आडे, सायबर पोलिस ठाणे नागपूर शहर चे पोशि रोहीत मताले तसेच क्राईम युनिट क्र ०१, नागपूर शहर चे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सपोनि सचिन भोंडे,पोहवा बबन राऊत, पोशी अमर रोटे तसेच परीमंडळ क्र ०१ मधील सर्व पोलिस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथके यांनी केली. सदर गुन्हयातील तरुणी मिसिंग झाल्यानंतर पोलिस पथकांनी जलद तपास करुन ४८ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला