Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कार्यवाहीची मालीका सुरुच…

9

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई…

अकोला (प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी पो.स्टे. चान्नीच्या ह‌द्दीमध्ये अवैद्यरित्या गावठी हातभ‌ट्टीची दारू गाळणा-या व विकणा-या तसेच जुगार खेळविणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्यांचेकडुन खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

(दि.२१मार्च) रोजी पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम आलेगाव येथे अप क्र. १४६/२०२४ कलम ६५ क, ड, फ, ई महा. दारूबंदी अधिनियम प्रमाणे आरोपी १) सैय्यद यूसुफ सैय्यद जहागीर (वय ५२ वर्षे), रा.इस्लामपूर आलेगाव २) निसारखान जावेद खान (वय ३२ वर्षे), रा.मोमीनपूरा आलेगाव यांचे जवळून ९६० लिटर सडवा मोहमाच, ८० लिटर गावरान हातभटीची दारू व इतर साहित्य असा एकुण १,०४,०००/ रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. चान्नी यांचे ताब्यात देण्यात आला.

त्या नंतर (दि.२३मार्च) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांनी पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम चान्नी येथे आरोपी नामे १) वसंता तुळशीराम अंभोरे रा.सुकळी २) संतोष उकर्डा पवार, रा.चान्नी हे वरली मटक्याचे खेळावर पैश्याचे हारजितने आकडे लावताना मिळुन आल्याने त्यांचे जवळुन वरली मटका साहित्य व नगदी व मोबाईल असा एकुण ४१९०/ रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम नवेगाव येथे आरोपी नामे १) सलीम खान तलीयार खान, रा.आलेगाव हा वरली मटक्याचे खेळावर पैश्याचे हारजितने आकडे लावतांना मिळून आल्याने त्यांचे जवळुन वरली मटका साहित्य व नगदी, मोबाईल व मोटर सायकल असा एकुण ६६,२००/ रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच धंदयाचा मुळ मालक आरोपी गुलाब खान सखावत खान रा.आलेगाव हा फरार असुन आरोपीचा शोध सुरू आहे. पो.स्टे. चान्नी ह‌द्दीमध्ये ग्राम आलेगाव येथील गोठाण परिसर येथे आरोपी नामे १) सदानंद किसन किरपे रा.आलेगाव हा वरली मटक्याचे खेळावर पैश्याचे हारजितने आकडे लावतांना मिळुन आल्याने त्यांचे जवळुन वरली मटका साहित्य व नगदी, २ मोबाईल असा एकुण १६,१८०/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच धंदयाचा मुळ मालक आरोपी गजानन बंड रा. आलेगाव हा फरार असुन आरोपीचा शोध सुरू आहे.

पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम आलेगाव येथील कन्हैया गावंडे याचे वेल्डींग थे दुकानाजवळ आरोपी नामे १) संजय नारायण कापकर रा.आलेगाव २) उद्द्दल दशरथ राठोड रा. शेकापुर हे वरली मटक्याचे खेळावर पैश्याचे हारजितने आकडे लावतांना मिळून आल्याने त्यांचे जवळुन वरली मटका साहित्य व नगदी, २ मोबाईल व मोटर सायकल असा एकुण ८२,५००/ रू था मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच धंदयाचा मुळ मालक आरोपी मोहम्मद शफी अब्दुल गणी रा. आलेगाव हा फरार असुन आरोपीचा शोथ सुरू आहे. या मध्ये एकुण ०४ जुगार रेड करून ०९ आरोपीतांवर विरुध्द कारवाई करून एकुण १,६९,०७०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पुढील कारवाई करिता पोलिस स्टेशन चान्नी च्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, फिरोज खान, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, विशाल मोरे, खुशाल नेमाडे, अक्षय बोबडे, अविनाश पाचपोर, मोहम्मद एजाज, अनिल राठोड, अन्सार अहेमद, धिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, अशोक सोनोने, प्रविण कश्यप, स्वप्नील चौधरी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.