Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सॅमसंगच्या या नवीन A सिरीज डिवाईसेसमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत. ”गॅलॅक्सी A55 5G आणि A35 5G देशातील 5जी स्मार्टफोन सेक्शनमधील, तसेच झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या मिड-प्रीमियम (३०,००० रूपये ते ५०,०००) सेक्शनमधील आमची लीडरशिप दृढ करण्यास साह्य करतील,” असे सॅमसंग इंडियाचे एमएक्सबिझनेस,उपाध्यक्ष आदित्य बब्बर, लॉन्चिंगच्या वेळी म्हणाले.
फ्लॅगशिप सारखी डिझाइन व टिकाऊपणा
पहिल्यांदाच गॅलॅक्सी A55 5G मध्ये मेटल फ्रेम आणि गॅलॅक्सी A35 5G मध्ये मागील बाजूस प्रीमिअम ग्लॉसची भर करण्यात आली आहे. ऑसम लिलॅक, ऑसम आइस ब्ल्यू आणि ऑसम नेव्ही या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे स्मार्टफोन्स आयपी67 प्रमाणित आहेत, म्हणजेच ते 1 मीटर फ्रेश वॉटरमध्ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. ६.६ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आणि किमान बेझल्ससह १२० हर्टझ रिफ्रेश रेट अत्यंत सुलभ कार्यक्षमता देते. या स्मार्टफोन्सच्या पुढील व मागील बाजूस कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस+ संरक्षणासह फ्लॅगशिप सारखा टिकाऊपणा आहे.
फ्लॅगशिप सारखे कॅमेरा इनोव्हेशन्स
या नवीन A सिरीज स्मार्टफोन्समध्ये विविध नाविन्यपूर्ण एआय इम्प्रुव्हड कॅमेरा फीचर आहेत, जे युजरच्या कन्टेन्ट गेमला वेगळ्याच उंचीवर नेतात. फोटो रिमास्टर, इमेज क्लिपर आणि ऑब्जेक्ट इरेजरसह इतर अनेक फीचर आहेत. मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह एआय इमेज सिग्नल प्रोसेसिंग (आयएसपी) द्वारे इम्प्रुव्हड नाइटोग्राफी आहे, जे ए-सिरीजमध्ये अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक फोटोज कॅप्चर होण्याची खात्री देते.
फ्लॅगपिश लेव्हल सेफ्टी
सॅमसंग नॉक्स वॉल्ट सिक्युरिटी पहिल्यांदाच ए-सिरीजमध्ये येते आहे . हार्डवेअर आधारित सिक्युरिटी सिस्टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर हल्ल्यांपासून संरक्षण देते. यामुळे डिवाईसमधील सर्वात महत्त्वपूर्ण डेटासह लॉक स्क्रिन क्रेडेन्शियल्स जसे पिन कोड्स, पासवर्डस् आणि पॅटर्न्सचे संरक्षण होते.
आतापर्यंतची सर्वोत्तम कार्यक्षमता
4 एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेले नवीन एक्झिनॉस 1480 प्रोसेसर गॅलॅक्सी A555G ला शक्ती देते, तर गॅलॅक्सी A355G 5एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेल्या एक्झिनॉस 1380 प्रोसेसरसह अपग्रेड करण्यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्मार्टफोन्स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह 70 टक्क्यांहून अधिक मोठ्या कूलिंग चेम्बरसह येतात, ज्यामधून गेम असो किंवा मल्टी-टास्क असो सुलभ आऊटपुटची खात्री मिळते.
सर्वोत्तम अनुभव
गॅलॅक्सी A55 5G आणि गॅलॅक्सी A35 5G ग्राहकांना सॅमसंग वॉलेट मिळेल, जे मोबाइल वॉलेट सोल्यूशन आहे आणि तुम्हाला गॅलॅक्सी डिवाईसमध्ये महत्त्वाच्या गोष्टी सोईस्करपणे व सुरक्षितपणे ट्रान्सफर करण्यास मदत करते. यामध्ये तुमचे पेमेंट कार्डस्, डिजिटल आयडी, प्रवास तिकिटे अशा बाबी ॲड करू शकता.
व्हॉइस फोकस
या डिवाईसेसमध्ये अत्यंत लोकप्रिय व्हॉइस फोकस वैशिष्ट्य आहे, जे युझर्सना मोठ्या आवाजाबाबत चिंता न करता कॉल्स करण्याची व रिसिव्ह करण्याची सुविधा देते.
किंमत आणि उपलब्धता
Galaxy A55 5G ची किंमत
- 8GB+128GB – 36,999 रुपये
- 8GB+256GB- 39,999 रुपये
- 12GB+256Gb -42,999 रुपये
Galaxy A35 5G ची किंमत
- 8GB+128GB – 27,999 रुपये
- 8GB+256GB- 30,999 रुपये
सर्व किमतींमध्ये एचडीएफसी, वनकार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक कार्ड्सवरील 3000 रूपयांच्या बँक कॅशबॅकसह 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन्सचा समावेश आहे. तसेच, ग्राहक सॅमसंग फायनान्स आणि सर्व आघाडीच्या एनबीएफसी सहयोगींच्या माध्यमातून प्रतिमहिना 1792 रूपयांच्या ईएमआयसह गॅलॅक्सी A55 5G आणि प्रतिमहिना 1723 रूपयांच्या ईएमआयसह गॅलॅक्सी A35 5जी खरेदी करू शकता.गॅलॅक्सी हे फोन सॅमसंग एक्सक्लुसिव्ह व पार्टनर स्टोअर्स, Samsung.com आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.