Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Apple ची iPhone 15 सीरीज लाँच झाल्यानंतर सहा महिन्यांनी Flipkart नं iPhone 14 चा बेस १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६९,९९० रुपयांच्या ऐवजी ५६,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच २५६जीबी आणि ५१२जीबी व्हेरिएंट अनुक्रमे ६९,९९९ रुपये आणि ८६,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डचा वापर करून हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. ईएमआय ऑप्शन २,००४ रुपये प्रति महिन्यापासून सुरु होत आहे आणि ५५,५०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील ऑफर केला जात आहे.
तसेच, iPhone 14 Plus चा १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या ६६,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. याचा २५६जीबी मॉडेल ७६,९९९ रुपयांमध्ये तर ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंटनंतर ९६,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. ICICI बँकेच्या डेबिट कार्ड, Citi बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रँजॅक्शनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या खरेदीवर २,००० रुपयांची एक्स्ट्रा सूट देखील आहे. त्यामुळे इफेक्टिव किंमत ६४,९९९ रुपये होते. नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन २,३५६ रुपये प्रति महिन्यापासून सुरु होते. एक्सचेंज डिस्काउंट ५९,००० रुपयांपर्यंत मिळू शकतो.
iPhone 14 मध्ये ६.१‑इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, तर iPhone 14 Plus मध्ये मोठा ६.७‑इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. दोन्ही मॉडेलमध्ये Apple चा ए१५ बायोनिक चिपसेट आहे.iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा यूनिट आहे ज्यात १२-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आणि १२-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल सेन्सर आहे. फ्रंटला १२-मेगापिक्सलचा शूटर आहे. तसेच, दोन्ही मॉडेल धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहावे म्हणून आयपी६८ रेटेड बिल्ड सह येतात.