Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुंतागंतीच्या खुन प्रकरणाचा चाकन पोलिसांनी केला उलगडा…

10

खून करून दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक…

पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तरुणाचा खून लपविण्यासाठी त्याचे दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आरोपींचे हे पितळ उघड केले आहे. चाकण पोलिस स्टेशन कडील डीबी पथकाने म्हाळुंगे पोलिस स्टेशन कडील मिसिंग मधील आदित्य भांगरे यांच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने आरोपीला अटक केली आहे.

(दि.१८मार्च) रोजी रासे फाटा येथे मराठा हॉटेल मध्ये फिर्यादी स्वप्निल शिंदे याचेवर गोळीबार झाला होता. सदर बाबत चाकण पोलीस ठाणे गु. र. नं १९२/२०२४ भा. द. वी कलम ३०७, आर्म ॲक्ट ३ (२५) नुसार संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होता. चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सपोनि प्रसन्न जन्हाड व पथकाने मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयासंबंधी अमर नामदेव शिंदे, (वय २५ वर्षे), रा.कासार आंबोली ता.मुळशी जि.पुणे यास (दि.२३मार्च) रोजी ताब्यात घेऊन त्यास गुन्हयाचे अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने विचारपुस केली.

चाकण पोलिस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपी नामे अमर शिंदे याचेकडे INTERROGATION SKILL चा वापर करुन अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहीती दिली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे राहुल पवार याचा भाऊ रितेश संजय पवार याचा तीन महीन्यापुर्वी खुनाच्या छिन्न विछिन्न झालेल्या चेह-याचा फोटो आदित्य युवराज भांगरे, (वय १८ वर्षे), रा.भांगरे वस्ती, म्हाळुंगे, ता.खेड, जि.पुणे याने इंन्स्टाग्राम वर वारंवार स्टेटसला ठेवल्याच्या रागातुन राहुल पवार याने कट करुन अमर शिंदे तसेच त्याचे इतर दोन सहकारी यांनी मिळुन (दि.१६ मार्च) रोजी दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून अदित्य युवराज भांगरे याचे चारचाकी वाहनातुन अपहरण केले त्यास वाहनामध्ये बेदम मारहाण करुन त्याचा वायरचे सहाय्याने वाहनामध्येच गळा आवळुन खुन केला असल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने अधिक माहिती घेता अदित्य भांगरे हा बेपत्ता असल्याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं १६४/२०२४ भा.द.वि कलम ३६४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. आरोपी नामे – अमर नामदेव शिंदे, (वय २५ वर्षे), रा.कासार आंबोली ता.मुळशी, जि.पुणे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले होते.

म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीस अटक करुन गुन्हयाचा सखोल तपास केला असता आरोपी यांनी दिशाभुल करण्यासाठी मयताचा मोबाईल गोवा राज्य येथे सहभागी आरोपी सोबत पाठविला व अदित्य भांगरे यास निमगाव शिवारातील डोंगरामध्ये लाकडाचे सहायाने जाळल्याची माहिती दिली. सदर ठिकाणी मृतदेह जाळल्याच्या खुना दिसुन आल्या नाहीत, अधिक चौकशी करता आरोपीने कबुली दिली की, गुन्हयातील मयत अदित्य भांगरे याचे प्रेत महाराष्ट्र-गुजरात सिमेवर जंगलामध्ये जाळल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तपास पथक पाठवुन आरोपीने दाखविलेल्या ठिकाणावरुन प्रेताचे अर्धवट जळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल पवार व इतर साथीदारांचा शोध घेणेकरीता पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील पथके प्रयत्न करीत आहेत.

सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ.शिवाजी पवार पोलिस उप आयुक्त परिमंडळ ३ व राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलिस आयुक्त, चाकण विभाग चाकण यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, नितीन गिते वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हाळुंगे पोलिस ठाणे, डी.बी पथकाचे सपोनि प्रसन्न ज-हाड, पोउपनि नामदेव तलवाडे, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, पोहवा राजु जाधव, पोहवा हनुमंत कांबळे, पो हवा शिवाजी चव्हाण, नापोशि निखील शेटे, पोशि नितीन गुंजाळ, सुनील भागवत,  संदिप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदिप राळे,निखील वर्षे, . महेश कोळी, मपोशि . माधुरी कचाटे यांनी केलेली असुन खुनाच्या गुन्हयाचा पुढील तपास संतोष कसबे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि संतोष जायभाय व म्हाळुंगे पोलिस स्टेशन डी.बी. पथकाचे पोहवा राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, गाडे, विठठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.