Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

POCO चा सर्वात स्वस्त फोन आला भारतात; मिळतेय 12GB RAM सह 5000mAh ची बॅटरी

10

कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू पाहणार्‍या युजर्ससाठी पोकोने एक नवीन भेट आणली आहे. ब्रँडनं आपल्या POCO C61 मोबाइल फक्त ६,९९९ रुपयांमध्ये भारतीय बाजारात लाँच केला आहे. फोन 6GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो म्हणजे एकूण १२जीबी पर्यंत रॅम, ५००० एमएएचची बॅटरी, ९० हर्ट्झ एचडी प्लस रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, शानदार डिजाइन आणि अनेक आकर्षक फीचर्स सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ फुल स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि उपलब्धतेची माहिती.

POCO C61 ची किंमत

पोकोनं आपला नवीन मोबाइल दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. मोबाइलच्या ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे जो लाँच ऑफर अंतगर्त ६,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. POCO C61 चा ६ जीबी रॅम व १२८ जीबी मॉडेल फक्त ८,४९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Ethereal Blue, Diamond Dust Black आणि Mystical Green अश्या तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे. डिवाइसची सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर २८ मार्चपासून सुरु होईल.

POCO C61 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन पोको सी६१ फोनमध्ये ६.७१ इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १६५० x ७२० पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ५०० निट्स पीक ब्राइटनेस मिळते. इतकेच नव्हे तर स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास ३ आहे. पोको सी६१ मध्ये युजर्सना परफॉरमेंससाठी एंट्री लेव्हलचा हेलियो जी३६ चिपसेट मिळत आहे. हा एक ऑक्टा कोर चिपसेट आहे ज्यात हाय-स्पीड २.२ गीगाहर्ट्झ पर्यंतचा मिळतो. त्यामुळे मोबाइलमध्ये गेमिंगसह इतर कामे सहज करता येतात.

हा फोन ४जीबी आणि ६जीबी रॅम + ६४ जीबी तथा १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मुळे कमी बजेट मधेही चांगली परफॉर्मन्स देऊ शकतो. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. ज्याच्या मदतीनं १टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. नवीन पोको सी६१ मध्ये युजर्सना बॅक पॅनलवर AI टेक्नॉलॉजी असलेला ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. यात ८-मेगापिक्सलचा प्रायमरी मिळतो. तसेच, सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी ५-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

नवीन पोको मोबाइलमध्ये ब्रँडनं बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. ही चार्ज करण्यासाठी USB-C पोर्टच्या माध्यमातून १० वॉट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. कंपनीनं ही वीकेंड बॅटरी नावाने सादर केली आहे म्हणजे फोनमध्ये मोठा बॅकअप मिळण्याची शक्यता आहे. POCO C61 फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर, ऑडियोसाठी ३.५ मिमी हेडफोन जॅक, स्पिकर, कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम ४जी, ब्लूटूथ ५.३ आणि वाय-फाय ५ देखील आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.