Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलिसांची धडक कारवाई,अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात…..
आमगाव(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे तसेच अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिले आहेत
त्याअनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाडसत्र मोहीम राबविण्यात येत असून उपविभाग आमगाव अंतर्गत क्षेत्रातील पोलिस ठाणे परीसरात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर धाडी घालून कारवाई करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हनुन दिनांक 26/03 /2024 रोजी पोलिस ठाणे आमगाव अंतर्गत अंजोरा बिट परिसरात आमगाव ते देवरी मार्गावर दोन ईसम चारचाकी वाहनात अवैद्यरित्या दारू भरून वाहतूक करीत असल्याचे गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने प्राप्त खात्रीशीर खबरे वरून पोलिस निरीक्षक.युवराज हांडे, यांनी पोलिस पथकासह मौजा- बोरकन्हार ते पाऊळदवना जाणाऱ्या रोडवर सापळा रचून अंदाजे संध्या 5.30 वा. सुमारास धाड कारवाई केली असता एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड वाहन क्र. MH35 CV- 5405 ज्यात चालक ईसंम नामे 1) राकेश सुकचंद बिसेन वय 34 रा. धावडीटोला 2) देवानंद मोतीदास कुराहे वय-23 वर्ष रा. कुल्पा असे मिळून आले सुमो वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये मधल्या व मागच्या सिटवर देशी दारूनी भरलेले एकूण 15 खरड्याचे बॅाक्स (पेट्या) मिळून आल्यात त्यातील 10 बॅाक्समध्ये 480 नग बॉटल मध्ये 180 मिली नी देशी दारू भरलेले असून उर्वरीत 5 बॅाक्स मध्ये 500 नग देशी दारू 90 मिली नी भरलेले असे एकूण किंमती 51,100/- रु चा माल व पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड किंमती अंदाजे- 1,55,000/- असा एकूण 2,06,100/- रु चा मुद्देमाल विना परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने जप्त मुद्देमाल, वाहन व आरोपी यांना पो. स्टे.आमगाव येथे आणून अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी वर नमुद दोन्ही आरोपींविरुध्द यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदयांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे उपविभाग आमगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक- युवराज हांडे, सपोनि.चव्हाण, पोहवा. दसरे, बर्वे, पोशि. उपराडे शेंडे पोलिस ठाणे आमगांव यांनी कामगिरी केली आहे.