Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुख्यात गुंड मयुर जाधव याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दि.(२८) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे, वाठोडा, नंदनवन, कळमना आणि सक्करदरा नागपूर शहराचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द तसेच अवैध सावकारी व्यवसाय करणारा कुख्यात गुंड नामे मयुर वल्द गजानन जाधव, वय २२ वर्ष, रा. प्लॉट नं. ४६, खरबी,साईबाबा नगर, खरबी ले-आऊट, जय संतोषी किराणा स्टोअर्सजवळ, पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक २८.०३.२०२४ रोजी स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला आहे
त्यास दि. २८.०३.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या गुंडावर पहिल्यांदाच एमपीडीए कायदयातंर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सुध्दा अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयांतर्गत कारवाई करण्यात येईल असे पोलिस आयुक्तांनी या कार्यवाही द्वारे स्पष्ट केले आहे.मयुर वल्द गजानन जाधव याचेविरूध्द पोलिस ठाणे वाठोडा, नंदनवन, कळमना आणि सक्करदरा नागपूर शहर
येथे अवैध सावकारी व्यवसाय करणे, लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यानंतर त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात व्याजाची वसुली करणे, न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण करणे, संपत्तीचे नुकसान करणे, तसेच घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, शातंता भंग करण्याच्या उददेशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्रासह दरोडा टाकण्याची तयारी करणे, दरोडा घालण्याकरिता एकत्र जमणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, एखादया व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालुन खंडणी मागणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, हद्दपार व मनाई आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
मयुर वल्द गजानन जाधव याचेविरुध्द गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिस ठाणे नंदनवन अंतर्गत सन
२०१८ व २०१९ मध्ये कलम ११० (ई) (ग) सी.आर.पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त, परि. क्र. ४, नागपूर शहर यांचे आदेशान्वये ०१ वर्षाकरिता हदपार करण्यात आले होते. त्यानंतर सन २०२२ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आली होते.त्याचेकडुन रू. १०,०००/- रक्कमेचे ०२ वर्षाकरिता अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु सदर बंधपत्राचे उल्लंघन
अलीकडील काळात त्याने पोलिस ठाणे वाठोडा हद्यीत हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह—अतिक्रमण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, एखादया व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालून खंडणी मागणे, शातंता भंग करण्याच्या उददेशाने जाणीवपूर्वक अपमान करणे इत्यादी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती मयुर वल्द गजानन जाधव याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने
आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय दिघे पोलिस ठाणे वाठोडा,नागपूर शहर यांनी नमुद आरोपीस स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास छत्रपती संभाजीनगर, हर्सुल काराग्रुहात ठेवण्याबाबतचे आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी नागपुर शहरातील नागरीकांना आवाहन केले की, कोणतीही व्यक्ती अवैधरित्या सावकारी करीत असेल अशा अवैधरित्या सावकारी करणाऱ्याविरूध्द तकार असल्यास त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे कार्यालयात किंवा संबंधीत पोलिस ठाण्यात निर्भयपणे तक्रार नोंदवावे. अशा अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल.